ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जात आहे. विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघात वॉर्नर एक महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या सर्वांनाच चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा देखील आहे. वॉर्नरच्या चाहत्यांसाठी त्याने स्वतः एक महत्वाची माहिती दिली आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) सध्या 35 वर्षांचा आहे आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी त्याने अनेक महत्वापूर्ण सामन्यांमध्ये प्रदर्शन केले आहे. अनेकदा वॉर्नरच्या निवृत्तीच्या चर्चा होत असतात. चाहत्यांना देखील अनेकदा हा प्रश्न पडत असतो. आता त्याने स्वतः याविषयी महत्वाची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेशी बोलताना वॉर्नर म्हणाला की, “मी टी-20 विश्वचषक खेळत राहील आणि 2024 विश्वचषकापूर्व खेळण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या माझे लक्ष्य पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकावर (एकदिवसीय) आहे.”
वॉर्नर म्हणाला की, “मी अलिकडच्या दिवसांमध्ये स्वतःच्या कौशल्यांवर काम करत आहे. मी फिट राहण्याच्या प्रयत्नात आहे आणि जेवढे शक्य असेल तितका फिट राहण्याचा प्रयत्न करेल, जे सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्हाला तिन्ही प्रकारांमध्ये खेळायचे असेल, तर फिट आणि मजबूत राहावे लागेल आणि मी हे नक्कीच करत आहे. सध्या माझ्याकडे खेळण्यासाठी किती कसोटी सामने आहेत, हे मी पाहील. त्यानंतर मी कसोटी क्रिकेट आणि तिन्ही प्रकारांमध्ये सोबत खेळायचे की नाही, हा निर्णय घेईल.”
दरम्यान, वॉर्नर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा एक महान सलामीवर आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये संघाचा एक महत्वाचा भाग म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. त्याने 96 कसोटी, 138 एकदिवसीय आमि 95 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये टी-20 विश्वचषक खेळला गेला होता आणि वॉर्नर या स्पर्धेचा मालिकावीर देखील ठरला होता. ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना शनिवारी (22 ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभव स्वीकारला होता, पण विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्यासआठी संघ पूर्ण प्रयत्न करेल. वॉर्नरला देखील या सामन्यात चांगले प्रदर्शन करावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एमसीए निवडणुकीत तेंडुलकर-गावसकरांसह 8 क्रिकेटपटू मतदानापासून वंचित! धक्कादायक कारण आले समोर
भल्या-भल्यांना मागे टाकत 2022 वर ‘सिकंदर’ची हुकूमत! आता झिम्बाब्वेलाही नेले यशाच्या शिखरावर