आॅकलँड | आज न्युझीलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० सामन्यात न्युझीलँडच्या २४३ धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने केवळ १८.५ षटकांत पार करत नवा विश्वविक्रम केला. या सामन्यात न्युझीलँडकडून मार्टीन गप्टीलने शतकी खेळी केली परंतु यामुळे त्याची शतकी खेळी व्यर्थ गेली.
हा टी२०मधील धावांचा पाठलाग करुन मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. यापुर्वी विंडीज संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३५ धावांचा पाठलाग करताना ६ बाद २३६ धावा केल्या होत्या.
या सामन्यात अनेक विक्रम झाले. ते असे-
-तब्बल ६४९ टी२० सामन्यात प्रथमच दोन्ही संघांनी शतकी सलामी दिली.
-टी२० सामन्यात दुसऱ्या डावातील २४५ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
-या सामन्यात एकुण ४८८ धावा झाल्या. यापुर्वी विंडीज विरुद्ध भारत सामन्यात ४८९ धावा झाल्या होत्या.
-आजच्या टी२० सामन्यात तब्बल ३२ षटकार खेचले गेले. यापुर्वी केवळ विंडीज विरुद्ध भारत सामन्यात ३२ षटकार मारले गेले होते.
– या सामन्यात मार्टीन गप्टीलने एक खास विक्रम केला.यापुढे टी२० सामन्यात कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. त्याने टी२० क्रिकेटमध्ये ७३ सामन्यात २१८८ धावा केल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर होता. त्याने ७१ सामन्यात २१४० धावा केल्या अाहेत.
-बेन विलर या गोलंदाजाने आज ३.१ षटकांत चक्क ६४ धावा दिल्या. यापूर्वी केवळ बॅरी मॅककॅर्टी या आर्यंलॅडच्या खेळाडूने ४ षटकांत ६९ धावा दिल्या होत्या.