---Advertisement---

ठरलं तर! ऍशेसमध्ये यष्टीमागे पेनची जागा घेणार ‘हा’ खेळाडू, कसोटी पदार्णाचीही मिळणार संधी

---Advertisement---

या महिन्याच्या ८ तारखेपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्विवार्षिक ऍशेस मालिकेला सुरुवात होत आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अंतिम १५ जणांचा संघ घोषित केला आहे. खरंतर संघ आधी घोषित करण्यात आला होता. पण, गेल्या काही दिवसात टिम पेनची माघार आणि नेतृत्त्वातील बदल यामुळे १५ जणांच्या संघात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला काही बदल करावे लागले आहेत.

ऍलेक्स कॅरेचे पदार्पण
याबरोबरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे की यष्टीरक्षक फवंदाज ऍलेक्स कॅरे या मालिकेतून कसोटीत पदार्पण करणार आहे. त्याला टिम पेनच्या ऐवजी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जागा मिळेल.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा नियमिक कसोटी यष्टीरक्षक टिम पेनने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. त्याच्यावर चार वर्षांपूर्वी एक महिला कर्मचारीला अश्लिल संदेश आणि फोटो पाठवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्याने हे मोठे निर्णय घेतले.

पेनच्या माघारीने कॅरेच्या पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅरे ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणारा ४६१ वा खेळाडू ठरणार आहे.

कमिन्स करणार नेतृत्त्व
पेनने कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला असल्याने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे देण्यात आले आहे. तसेच स्टिव्ह स्मिथ उपकर्णधार असेल.

याशिवाय मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ जवळपास निश्चित आहे. पहिल्या कसोटीसाठी उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेडला संधी मिळू शकते. तसेच झाय रिचर्डसन देखील खेळू शकतो. याशिवाय मायकल नेसर आणि मिशेल स्विप्सन हे देखील कॅरेसह पदार्पण करण्याची शक्यता दाट आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीचा प्रमुख जॉर्ज बेलीने संकेत दिले होते की मार्कस हॅरिस डेव्हिड वॉर्नरसह सलामीला फलंदाजी करेल.

पहिल्या दोन ऍशेस कसोटींसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ 
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ (उपकर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, मार्कस हॅरिस, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्कस लॅब्यूशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, मिशेल स्टार्क, मिशेल स्विप्सन, डेविड वॉर्नर.

ऍशेस २०२१-२२ मालिकेचे वेळापत्रक 
८-१२ डिसेंबर २०२१ – पहिली कसोटी – द गॅबा, ब्रिस्बेन
१६-२० डिसेंबर २०२१ – दुसरी कसोटी – ऍडलेड ओव्हल
२६-३० डिसेंबर २०२१ – तिसरी कसोटी – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड
५-९ जानेवारी २०२२ – चौथी कसोटी – सिडनी क्रिकेट ग्राऊंड
१४-१८ जानेवारी २०२२ – पाचवी कसोटी – पर्थ स्टेडियम

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० नंतर आता विराट कोहली वनडेचेही कर्णधारपद गमावणार? लवकरच घेतला जाणार निर्णय

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स

पंजाबला नाकारून संकटात अडकला राहुल! फ्रँचायझीने बीसीसीआयला तक्रार करत म्हटले, ‘त्याने नव्या टीमला कॉल…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---