Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स

December 2, 2021
in Covid19, क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/ BCCI


भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी कोव्हिडच्या नव्या व्हेरिएन्टने खळबळ माजवली आहे. तरी बीसीसीआयने दौरा करण्याचा निर्णय घेतला असून या दौऱ्यात नियमांचे काटेकोरपणे पालन होईल असे देखील सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघ केवळ २ हॉटेलवर वास्तव्य करून चार वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळेल. या दौऱ्यात भारत एकूण १० सामने खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष लौसेन नायडू यांनी दौऱ्याआधी महत्वपूर्ण बाबी सांगितल्या आहेत. भारताच्या आफ्रिका दौऱ्यात नियमांचे काटेकोरपणे पालन होईल. त्यांनी हे देखील सांगितले की प्रत्येक सामन्यात २००० दर्शकांनाच स्टेडियममध्ये परवानगी असेल. दर्शकांना लसीचे डोस घेणं बंधनकारक असेल. ते म्हणाले, “कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टबद्दल खूपच चर्चा होत आहे, पण तो एवढा हानिकारक नाही.”

एनडीटीव्हीसोबत बोलताना नायडू म्हणाले, “आफ्रिका बोर्ड बीसीसीआयच्या सतत संपर्कात असून चर्चा करत आहेत. हा दौरा रद्द होणार नाही, यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक देखील केलं. संपूर्ण जगात ओमिक्रोन व्हेरिएन्टमुळे अनावश्यक चर्चा होत असून आफ्रिकेतून उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय देखील खूप सावधानकारक आहे. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तरी आम्ही तिला नीट नियंत्रणात आणू.”

उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय व्यर्थ
आफ्रिका बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले की, “विश्व स्वास्थ्य संगठनने संक्रमण रोखण्यासाठी उड्डाणे रद्द केली आली आहेत, ज्याचा काहीही उपयोग नाही आहे. हा निर्णय गरजेपेक्षा जास्ती सावधकारक वाटतोय. भारतीय सरकारने नवीन व्हेरिएन्टचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रतिबंध केलेले आहेत. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी खास सुरक्षा देखील मागितली आहे. या मालिकेसाठी कोरोनाचे कडक नियम पाळावे लागणार आहेत.”

कुठे आणि कधी होणार सामने
या दौऱ्यात भारताचे पहिले दोन कसोटी सामने जोहान्सबर्ग आणि सेंच्युरियनमध्ये खेळवले जातील. या दोन कसोटी सामन्यांसाठी भारत एका हॉटेलमध्ये वास्तव्य करेल. त्यानंतर तिसरा कसोटी सामना, ३ वनडे आणि टी-२० मालिका केपटाऊन आणि पार्लमध्ये खेळवण्यात येईल. या आठ सामन्यांसाठी संघ एकाच हॉटेलमध्ये थांबणार आहे.

संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघ फक्त दोन हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहे. दौऱ्यात जैव सुरक्षित वातावरण फक्त एकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. दोन्ही संघ जैव सुरक्षित वातावरणात राहतील. जर कोरोनाचा प्रसार वाढला तर भारतीय संघ मायदेशी परतेल.

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाबला नाकारून संकटात अडकला राहुल! फ्रँचायझीने बीसीसीआयला तक्रार करत म्हटले, ‘त्याने नव्या टीमला कॉल…’

तब्बल ५ वर्षानंतर वानखेडेवर रंगणार कसोटी, असा राहिला आहे भारताचा या मैदानावरील इतिहास

मेगा लिलावापूर्वी नव्या संघांना ३ खेळाडू विकत घेण्याची मुभा, पण कोणावर किती खर्च करू शकतील टीम?


Next Post
Virat Kohli

टी२० नंतर आता विराट कोहली वनडेचेही कर्णधारपद गमावणार? लवकरच घेतला जाणार निर्णय

Photo Courtesy: Twitter/ICC

ठरलं तर! ऍशेसमध्ये यष्टीमागे पेनची जागा घेणार 'हा' खेळाडू, कसोटी पदार्णाचीही मिळणार संधी

Photo Courtesy: Twitter/ IPL

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय, 'स्टार खेळाडूंना संघातून मुक्त करणे म्हणजे हार्टब्रेकच'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143