---Advertisement---

बांगलादेशने पहिल्यांदाच टी२०त मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भर मैदानात ‘अशी’ कृती

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 12:33 PM
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (४ ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात बांगलादेश संघाने ५ गडी राखून ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा उडवला आणि मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. तत्पुर्वी पहिल्या टी-२० सामन्यातही बांगलादेशने अविश्वसनीय कामगिरी करत विजयी पताका झळकावली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव झाला असला तरी देखील सामना झाल्यानंतर त्यांनी मन जिंकणारे कृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियन संघ आपल्या आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा हे खेळाडू सामना विजयानंतर, विकेट घेतल्यानंतर किंवा अर्धशतक-शतक केल्यानंतर आक्रमक होऊन जल्लोष करताना दिसून येतात. परंतु पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी असे काही कृत्य केले आहे. जे पाहून क्रिकेट चाहत्यांना त्यांचा अभिमान वाटला असेल.

पहिल्या सामन्यातील दणदणीत विजयानंतर बांगलादेश संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केला. हा जल्लोष पाहून मैदानात उपस्थित असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केल्याचे पाहायला पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंकडून खूप कमी वेळेस असे पाहायला मिळते. हे पाहून बांगलादेश संघातील खेळाडूंनी देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहते देखील या खेळाडूंचे कौतुक करत आहेत.(Austrelian Cricket players appreciate Bangladesh players watch video)

https://twitter.com/WaterBhai/status/1422591616489979909?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1422591616489979909%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fban-vs-aus-australians-appreciation-towards-the-bangladeshi-players-watch-video-80870

पहिल्या सामन्यातील विजयी घोडदौड कायम राखत बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाला २० षटक अखेर ७ बाद १२१ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये मिचेल मार्शने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर मोईसिस हेनरीक्सने ३० धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. बांगलादेश संघाकडून गोलंदाजी करताना मुस्तफिजुर रेहमानने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाकडून अफिफ होसेनने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तर शाकीब अल हसनने २६ धावांचे योगदान दिले. हा सामना बांगलादेश संघाने ८ चेंडू आणि ५ गडी शिल्लक असताना आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

जबरदस्त! टप्पा घेतला, बॅटमधून मिस झाला अन् थेट पॅडला धडकला; शार्दुलच्या चेंडूवर रूटचे लोटांगण

खतरनाक यॉर्कर! अंडरसनला काही कळायच्या आतच झाली बत्ती गुल, बुमराहची रिऍक्शन होती बघण्यासारखी

शमीची बालिश चूक, बेयरस्टोला धावबाद करण्याची संधी असताना दुसऱ्याच बाजूला फेकला चेंडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---