ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आपल्या घातक आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक दिग्गजांनी दांडी गुल केली आहे. तर त्याचा भाऊ ब्रेंडन स्टार्क हा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उतरला होता. अशातचमिचेल स्टार्कसह बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू त्याला थेट मैदानातून समर्थन करताना दिसून आले आहेत, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ब्रेंडन स्टार्कने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी या खेळातील प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आपला सराव सोडून त्याला मैदानातूनच समर्थन करताना दिसून आले. ब्रेंडन स्टार्कने अंतिम सामन्यात चांगले प्रदर्शन केले. परंतु त्याला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये येत्या ३ ऑगस्टपासून टी-२० मालिका खेळायची आहे. संघाचा कर्णधार आरोन फिंच उपलब्ध नसल्याने या संघाचे नेतृत्व मॅथ्यू वेडला देण्यात आले आहे. (Austrelian cricketers in Dhaka cheer for Mitchell stracs brother Brandon competing at Tokyo Olympics)
Scenes from Dhaka last night as the Aussies put training on hold to watch Brandon Starc, Mitch's brother, compete in the high jump final #Tokyo2020 #Olympics pic.twitter.com/wgiZyNI4o0
— cricket.com.au (@cricketcomau) August 1, 2021
Mitchell Starc and the Aussies tuning into @bstarc_’s Olympics high jump final after training in Dhaka pic.twitter.com/A5X83Qw2ln
— Louis Cameron (@LouisDBCameron) August 1, 2021
अशी आहे ब्रेंडन स्टार्कची कारकीर्द
ब्रेंडन स्टार्कने २०१० मध्ये युथ ऑलिम्पिक स्पर्धेतून पदार्पण केले होते. या स्पर्धेत त्याने २.१९ मी. उंच उडी मारत रौप्य पदक पटकावले होते. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. तसेच २०१४ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो ८ व्या क्रमांकावर होता. तसेच २०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत देखील त्याने स्थान मिळवले होते. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करत १५ वे स्थान मिळवले होते.
त्यानंतर दुखापतीमुळे २०१७ मध्ये तो विश्व अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळवू शकला नव्हता. परंतु २०१८ मध्ये त्याने जोरदार पुनरागमन करत २.३२ मीटरची उडी मारत सुवर्ण पदक पटकावले होते. याचवर्षी त्याने डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील विजय मिळवला होता. २०२१ मध्ये त्याने २.३३ मीटरची उडी मारत राष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवला. याच कामगिरीच्या जोरावर त्याला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: टीम इंडियाच्या सरावाच्या नानाविध तऱ्हा, रोहितच्या अनोख्या कल्पनेने खेळाडूही झाले लोटपोट
‘हे’ ३ भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसाठी आहेत मोठे प्रतिस्पर्धी; टी२० विश्वचषकात घेऊ शकतात जागा
क्रिकेटविश्वातील ५ सर्वात वजनदार क्रिकेटपटू, एकाने संघाला बनवलंय विश्वविजेता