इंग्लंडविरुद्धच्या IND VS ENG पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘सामनावीर’ Player of the Match पुरस्कार जिंकून Axar Patel अक्षर पटेलने ऐतिहासिक कामगिरी केली. एजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात प्रथम त्याने 4 बळी घेतले नंतर नाबाद अर्धशतक (57) झळकावून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ POTM पुरस्काराने गौरवण्यात आले.
या पुरस्कारासह, इंग्लंडविरुद्ध तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) ‘सामनावीर’ होणारा अक्षर पटेल हा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी ही कामगिरी केली होती. मात्र, ते तिघे विशिष्ट विभागांत (फलंदाजी किंवा गोलंदाजी) उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात, तर अक्षरने एक ‘खरा अष्टपैलू खेळाडू’ म्हणून हा मान मिळवला.
इंग्लंडविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये’सामनावीर’ ठरलेले भारतीय खेळाडू
रोहित शर्मा
जसप्रीत बुमराह
कुलदीप यादव
अक्षर पटेल*
259 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा (11) आणि विराट कोहली (5) लवकर बाद झाल्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 48 अशी झाली होती.
त्यानंतर, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत डाव सावरला. मात्र, दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या गिलला 80 धावा केल्यानंतर ‘रिटायर्ड हर्ट’ व्हावे लागले. त्यानंतर श्रेयस अय्यर 35 धावांवर धावबाद झाला आणि केएल राहुल केवळ 1 धाव काढून बाद झाला.
जेव्हा भारताचा डाव पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता, तेव्हा अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबाबदारी स्वीकारली. टी-20 मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या या जोडीने एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन केले. अक्षर (नाबाद 57) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 52) यांनी भारताला शानदार विजयाकडे नेले.
याआधी, जो रूटच्या 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांच्या जोरावर इंग्लंडने 259 धावांची मजल मारली होती. एका टप्प्यावर इंग्लंडची अवस्था 5 बाद 80 अशी बिकट झाली होती, तरीही त्यांनी सन्मानजनक धावसंख्या उभारली. मात्र, भारतीय फलंदाजांनी हे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. परिणामी इंग्लंडच्या गोलंदाजांचे प्रयत्न निष्फळ ठरले.





