---Advertisement---

अक्षर पटेलचे इंग्लंडशी खास कनेक्शन! कारकिर्दीतील अनेक सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्धच

On: बुधवार, जुलै 15, 2026 12:18 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (14 जुलै) एजबस्टनमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये अक्षर पटेलने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर अक्षरचे इंग्लंडसोबत काही खास कनेक्शन असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्याच्या कारकिर्दीतील 5 महत्त्वाच्या कामगिरी इंग्लंडविरुद्ध नोंदवल्या गेल्या आहेत.

अक्षरने पहिले तर गोलंदाजीमध्ये कमाल केली. त्याने 9.5 षटकांत 62 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना संघ बिकट परिस्थितीत असताना 52 चेंडूंमध्ये 57 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा हकदार ठरला. त्यामुळे त्याने आणखी एका विशिष्ट यादीत प्रवेश केला. आता त्याच्यात आणि इंग्लंडमधील खास नाते जाणून घेऊ,

अक्षर पटेलची इंग्लंडविरुद्ध कामगिरी-
1) इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक पाच विकेट्स (फायफर्स) – अक्षरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 5 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली असून त्यापैकी 4 वेळा तर त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध केली.
2) त्याची कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी 38 धावांवर 6 विकेट्स अशी आहे, जी त्याने इंग्लंडविरुद्ध केली.
3) त्याची एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी 62 धावांवर 4 विकेट्स अशी असून ती त्याने नुकत्याच झालेल्या सामन्यात केली.
4) त्याने इंग्लंडविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला
5) त्याने एकमेव आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला, जो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आला.

यावरून अक्षरला इंग्लंडविरुद्ध नेहमीच खेळायला आवडते, असे दिसते. तो इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा केवळ चौथाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू
रोहित शर्मा
जसप्रीत बुमराह
कुलदीप यादव
अक्षर पटेल*
(Axar Patel Performance against England, ENGvsIND first ODI)

सामन्याची स्थिती
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी जो रूट आणि लियाम डॉसन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्व विकेट्स गमावत 47.5 षटकांत 258 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 45.2 षटकांत 4 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले. आता या मालिकेतील दुसरा सामना 16 जुलैला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---