---Advertisement---

भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण? गिल-सुंदर नव्हे, ‘या’ खेळाडूला मिळाला सामनावीर पुरस्कार

On: बुधवार, जुलै 15, 2026 7:15 AM
---Advertisement---

टीम इंडियाने अखेर यूके TEAM INDIA ENGLAND TOUR 2026 दौऱ्यावर आपला पहिला विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने INDIA BEAT ENGLAND BY 6 WICKETS इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. याआधी, भारताला आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 ने आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-0 ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे, यूके दौऱ्यावर भारताच्या विजयाची मोठी अपेक्षा होती. अखेरीस, 14 जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर भारताने विजय नोंदवला.

या विजयात कर्णधार शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, अष्टपैलू कामगिरीमुळे अक्षर पटेलला ‘सामनावीर’ PLAYER OF THE MATCH पुरस्कार मिळाला.

अक्षर पटेलने AXAR PATEL 9.5 षटकांत 62 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टोंग यांना बाद केले. डावाच्या उत्तरार्धात घेतलेल्या या विकेट्समुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले.

फलंदाजी करताना, भारत कठीण परिस्थितीत असताना अक्षरने संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 52 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या, ज्यामध्ये 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ POTM पुरस्कार मिळाला.

भारतीय कर्णधार SHUBMAN GILL शुबमन गिलने 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, मात्र दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले (रिटायर्ड हर्ट). गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने WASHINGTON SUNDER 4 षटकांत केवळ 13 धावा दिल्या. त्यानंतर, फलंदाजीत त्याने 63 चेंडूत 52 धावा करत त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडसाठी जो रूटने 76 आणि लियाम डॉसनने 68 धावा केल्या; मात्र, अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

टी-20 मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करू शकलेल्या अक्षर पटेलने वनडे मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. ही बाब भारतासाठी एक सकारात्मक संकेत मानली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---