पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यातील नात्याविषयी मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या. अनेक बातम्यांमध्ये शोएब आणि सानिया एवढ्या वर्षांच्या सुखी संसारानंतर वेगळे होणार असल्याचेही सांगितले गेले. पाकिस्तानमधील अभिनेत्री आयशा उमर हिच्यामुळे शोएब आणि सानियाच्या नात्यात बाधा आल्याचेही सांगितले जात आहे. अशात आता आयशाने स्वतः याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब मलिक (Shoaib Malik) पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. तर दुसरीकडे सानिया मिर्झा (Sania Mirza) भारताची स्टार टेनिसपटू असून तिने एकूण सहा वेळा ग्रॅन्डस्लॅम जिंकले आहे. या दोघांचे लग्न ही क्रीडाजगतालीत 2010 साली मोठा चर्चेचा विषय ठरला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांमधून सानियाच्या या निर्णयाविषयी प्रतिक्रिया त्यावेळी आल्या होत्या. त्यानंतर मागच्या 12 वर्षांपासून शोएब आणि सानिया सोबत आहेत. मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.
पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर (Ayesha Omar) सोबत शोएब मलिकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सानियासोबत शोएबचे नाते खराब होण्यामागे देखील आयशाला अनेकजण जबाबदार धरत आहेत. मात्र, अभिनेत्रीने याविषयी स्पष्टीकरण देताना या सर्वो गोष्टी चुकीच्या असल्याचे सांगितले. या प्रकरणी स्पष्टीकरण देताना आयशाने सांगितले की, व्हायरल होत असलेले फोटो जुने असून तो एक प्रोफेशनल शुट होता. “शोएब मलिकसोबतचा रोमँटिक फोटो मागच्या वर्षीचा आहे. पण माध्यमांनी फोटो चुकीच्या पद्धतीने वापरला. त्याच्यासोबत एक प्रोफेशनल फोटोशूट केला गेला होता. जर कुणासोबत असे संबंध असतेच, तर अशा पद्धतीचा फोटोशूट केलाच नसता. आम्हा दोघांमध्ये असे कुठलेच संबंध नाहीत,” असे आयशा म्हणाली.
आयशा पुढे बोलताना असेही म्हणाली की, “मी कधीच कोणत्या विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार देखील करू शकत नाही.” तिने यापूर्वी देखील एका मुलाखतीत शोएबसोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. त्यावेळी आयशा म्हणाली होती की, “शोएब मिलकचे लग्न झाले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपूट त्याच्या पत्नी आणि मुलांसाबोत आनंदात आहे. मी शोएब आणि सानियाचा खूप सन्मान करते.” दरम्यान, येत्या काळात शोएब आणि सानिया यांच्याविषयी येणाऱ्या माहितीवर देखील चाहते नजर लावून बसले आहेत. (Ayesha Omar again clarified on the relationship between Shoaib Malik and Sania Mirza)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एवढी हिंमत! बांगलादेशी यष्टीरक्षकाकडून विराटला शिवीगाळ, पुढे जे घडले ते पाहाच…
बांगलादेशविरुद्धही थंडच राहिली राहुलची बॅट; दोन्ही सामन्यात ठरला फुल फ्लॉप