दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने रणजी ट्रॉफीच्या एलिट गट ‘ड’ मध्ये झारखंडविरुद्ध दमदार द्विशतक झळकावले. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बदोनीने 216 चेंडूत 205 धावांची नाबाद खेळी खेळली. कर्णधार आयुष बदोनीच्या द्विशतकाच्या जोरावर दिल्ली संघाने झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित ठेवला. या खेळीत आयुषने 16 चौकार आणि 10 उत्तुंग षटकार मारले. बदोनीशिवाय अन्य कोणताही खेळाडू दिल्लीसाठी समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.
या सामन्यात झारखंड संघाने प्रथम फलंदाजी करताना कुमार कुशाग्राच्या 156 धावा आणि विराट सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर 382 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्ली संघाने दिवसाच्या अखेरच्या दिवशी 7 विकेट गमावून 388 धावा करून डाव घोषित केला. त्यामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या चमकदार खेळाने लहरी बनवणाऱ्या आयुष बदोनीला त्याच्या लखनऊ फ्रेंचायझीने मेगा लिलावापूर्वी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊने आयुषला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. अशा प्रकारे दिल्लीच्या या खेळाडूला 4 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे. आयुष गेल्या मोसमातही लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग होता. ज्यात त्याने शानदर कामगिरी केला होता.
🚨 Ranji Trophy Thriller! 🚨
Ayush Badoni delivers a spectacular 205* off 216 balls, smashing 10 sixes and 16 fours! 💥🔥His heroics help Delhi secure a crucial 1st innings lead over Jharkhand
Jharkhand: 382 all out
Delhi: 388/7
What an innings! 👏💪#RanjiTrophy #DelhiCricket pic.twitter.com/DVJCi8tMS9— DDCA (@delhi_cricket) November 16, 2024
आयुष बदोनी व्यतिरिक्त, लखनऊ संघाने आयपीएल मेगासाठी इतर पाच खेळाडूंनाही कायम ठेवले आहे. त्यापैकी पहिला वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आहे. संघाने निकोलस पूरनचा 21 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत समावेश केला आहे. याशिवाय रवी बिश्नोई आणि मयंक यादव यांनाही प्रत्येकी 11 कोटी रुपये मिळाले आहेत. तर अन्य अनकॅप्ड खेळाडू मोहसिन खानला आयुष बदोनीच्या बरोबरीने 4 कोटी रुपये मिळाले आहेत. आशा स्थितीत आयपीएल 2025 पूर्वी आयुष बदोनीचे शानदार फाॅर्म संघाला फायदेशीर ठरु शकते.
हेही वाचा-
बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत या दोन गोलंदाजांमध्ये रंगणार विशेष लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात
IND vs AUS; टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, सरावासाठी पुन्हा मैदानात उतरला स्टार फलंदाज
IND vs AUS: रोहित-शुबमनशिवाय टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार? संघाचं नेतृत्व कोणाकडे?