---Advertisement---

‘माशाल्लाह फिटनेस तगडीच आहे…’, जास्त वजनामुळे आझम खानला पाकिस्तान संघात संधी मिळत नाहीये?

On: शनिवार, फेब्रुवारी 25, 2023 3:51 PM
Azam Khan
---Advertisement---

इस्लामाबाद युनायटेड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आजम खान सध्या चर्चेच आहे. आझमने पाकिस्तान प्रीमियर लीग 2023 मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाविरुद्ध धमाकेदार खेळी केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या आझमने 42 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. या खेळीनंतर त्याला पाकिस्तान संघात पुनरागमनाची संधी मिळत नसल्याच्या चर्चाही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने त्याला फिटनेसविषयी प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर आझमने अगदी स्पष्टपणे दिले.

शुक्रवारी (24 फेब्रुवारी) इस्लामाबद युनायटेस संघाने आझम खान () याच्या 97 धावांच्या खेळीमुळे क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला पराभूत केले. आझमच्या या खेळीच्या जोरावर इस्लामाबाद संघाने 6 बाद 220 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात क्वेटा संघ 157 धावांवर गुंडाळला गेला. इस्लामाबादने हा सामना 63 धावांनी जिंकला. आझम खान सामनावीर ठरला. या अप्रतिम प्रदर्शनानंतर त्याचे पाकिस्तान संघात पुनरागमन व्हावे अशा चर्चा सुरू झाल्या. पण हा यष्टीरक्षक फलंदाज राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी फिट वाटत नाही. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्याला फिटनेसविषयी प्रश्न विचारला गेला.

पाकिस्तानचे माजी दिग्गज मोइन खान यांचा मुलगा आझम खान पाकिस्तानसाठी 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना आझम म्हणाला, “हे पाहा वजन आणि माझी फिटनेस आधीपासून अशीच आहे. माशाल्लाह सुरुवातीपासून माझी फिटनेस एवडीच भक्कम राहिली आहे. पण प्रयत्न हाच आहे की, चांगले प्रदर्शन करता आले पाहिजे. मी माझ्या प्रदर्शनाला जास्त महत्व देतो. बाहेर ज्या निगेटिव गोष्टी असतात, त्याकडे मी दुर्लक्ष करतो. बाकी प्रदर्शन तुम्हा सर्वांसमोर आहे. प्रदर्शनात जर काही कमी असेल, तर मला सांगू शकता.”

https://twitter.com/grassrootscric/status/1629204071893663748?s=20

“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर प्रत्येक खेळाडूला पाकिस्तानसाठी खेळायचे असते. प्रयत्न देकील त्यासाठीच चालू असतात. पण परिस्थितीच अशी तयार होते की, तुमची निवड केली जात नाही. तुम्ही निराश होता, पण प्रदर्शन करण्याशिवाय तुमच्या हातात काहीच नसते. माझ्या मते जो खेळाडू मानसिकरित्या सक्षम असतो, त्याच्याकडे सर्वकाही करून दाखवण्याची ताकत असते,” असे आझम पुढे म्हणाला. (Azam Khan spoke about his fitness after scoring 97 runs for the Islamabad )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---