हाताला बोटे कमी असतील तर कोणालाही त्रास होऊ शकतो आणि जेव्हा क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणात बोटाचा सतत वापर करावा लागतो. पण असाच एक गोलंदाज क्रिकेट विश्वात आला, ज्याला जन्मापासूनच एका हाताला दोन बोटे नव्हते. होय! हे खरे आहे. तो खेळाडू म्हणजे अझीम हाफिज. 1980 च्या दशकात त्यांनी पाकिस्तान संघाचे प्रतिनिधीत्व केले. वेगवान गोलंदाज अझीम हाफिज यांचा काल वाढदिवस होता. ते आज 57 वर्षांचे झाले.
29 जुलै 1963 रोजी जन्मलेले राजा अजीम हाफिज हे डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायचे. त्यांनी 1983-85 दरम्यान पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. उजव्या हातात दोन बोटे कमी असूनही हाफिजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 78 बळी टिपले. यात 18 कसोटीत 63 तर 15 वनडे सामन्यात 15 बळीचा समावेश आहे.
1977–78 मध्ये हाफीझने स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ते महान हनीफ मोहम्मद यांच्या जवळचे होते, त्यांचे भाऊ मुश्ताक आणि सादिक हेदेखील कसोटी क्रिकेटपटू होते. एकाच परिसरात राहात असल्याने त्या क्रिकेटपटूंपासून हाफिज यांना एक मोठी प्रेरणा मिळाली. त्याच्या घराजवळील अरुंद रस्त्यावर त्यांना क्रिकेटची बारकावे शिकायला मिळाले.
हाफिजच्या पालकांनी शारीरिक कमकुमवत पणामुळे त्यांच्या अभ्यासावर खूप भर दिला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यात ते यशस्वी झाले. पण नंतर या खेळाबद्दलची त्यांना प्रचंड आवड निर्माण झाली. त्यांना पुढे पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली. अखेरीस, त्यांची भारत दौर्यासाठी निवड झाली.
अनुभवी इम्रान खान यांना पायाच्या दुखापतीमुळे सामना खेळू शकत नव्हते. अशा परिस्थितीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फारच कमी अनुभव असलेल्या अझीम हाफिजला वेगवान गोलंदाजीसाठी बोलविण्यात आले. हफीझने सप्टेंबर 1983 मध्ये भारताविरुद्ध बंगळुरू कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हफीझला 10 विकेट्स मिळाले.
यानंतर, हफीझ यांनी ऑस्ट्रेलिया दौर्यामध्ये ‘मॅरेथॉन’ स्पेल टाकले आणि एकूण 19 विकेट घेतल्या. ऍडिलेड आणि पर्थ कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्यांदा डावात 5-5 विकेट घेतल्या. ऑक्टोबर 1984 मध्ये घरच्या मालिकेत लाहोरच्या निर्जीव खेळपट्टीवर हफीझने भारताच्या पहिल्या डावात 46 धावा देऊन 6 बळी घेतले. त्यानंतर, हाफिजने 1984-85 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सलग सहा कसोटी सामने खेळले आणि 22 बळी घेतले आणि येथे त्यांची कसोटी कारकीर्दही संपली, कारण वसीम अक्रम सारख्या गोलंदाजांचा उदय झाला होता.
पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज वकार युनूस याच्या डाव्या हाताला सर्वात लहान बोट नाही. बालपणी क्रिकेट खेळत असताना वकारच्या छोट्या बोटाला मोठी दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्या बोटाला काढून टाकले. पण तरीही वकारने क्रिकेट विश्वात त्यांच्या गोलंदाजीत दरारा निर्माण केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा हा ‘दिग्गज’ म्हणतो, स्टुअर्ट ब्रॉडच्या पायांमध्ये आहे स्प्रिंग
हार्दिक पंड्या झाला बाबा; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली गुडन्यूज
-स्टुअर्ट ब्रॉडमुळे जसप्रीत बुमराहचे झाले नुकसान; आयसीसी क्रमवारीत बसला झटका
ट्रेंडिंग लेख –
-या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…
-आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…
-क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’