भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2022 मध्ये दोन वेळा आमना सामना झाला. यातील एकदा भारत, तर एकात पाकिस्तानने विजय मिळवला होता. तुम्ही जर हे हायवोल्टेज सामने पाहिले नसतील, तर तुमच्यासाठी पुढच्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. असे असले तरी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अजहर महमूद याच्या मते यावेळी भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत दुबळा आहे.
मागच्या वर्षी आयसीसीचा टी-20 विश्वचषख यूएईमध्ये खेळला गेला. यावेळी पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळलेल्या सामन्यात एकही विकेट न गमावता विजय मिळवला होता. ही पहिली वेळ होती, जेव्हा एखाद्या विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता यावर्षी भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. परंतु, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेत खेळत नाहीये. संघाला त्याच्या अनुपस्थितीत नक्कीच नुकसान होणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) विश्वचषकाच्या तोंडावर पूर्णपणे फिट होऊन संघात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी दिग्गज अजहर महमूद (Azhar Mahmood) याने खास प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट पाकिस्तानसोबत बोलताना महमूद म्हणाला, “जेव्हा कधी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असतो उत्सुकता असने सहाजिक आहे. पाकिस्तानची गोलंदाजी मजबूत आहे. पण फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. भारताला एक मोठे नुकसान झाले आहे, कारण बुमराह ते बुमराहच्या अनुपस्थितीत खेळतील. त्यात अजून भर म्हणजे शाहीन फिट झाला आहे. अशात आमचे गोलंदाजी आक्रमण अधिकच भक्कम झाले आहे. मात्र, दुबईपेक्षा यावेळी खेळपट्टी वेगळी असेल. ऑस्ट्रेलियात चेंडू बॅटवर अधिक चांगल्या प्रकारे येईल. हा एक चांगला सामना असेल. पाकिस्तानचे अलिकडच्या काळातील प्रदर्शन आणि मानसिक स्थिती पाहता मला त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा आहे.”
दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. भारताला विश्वचषक अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानेच करायची आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांंनी रोखलं! श्रीलंकेकडून पाकिस्तानचा अवघ्या 1 धावेने पराभव, फायनल भारतासोबत
काय चाललंय! ऑस्ट्रेलियात दुसऱ्या सराव सामन्यातही रिषभ पंत फेल, टी20 विश्वचषकातून होणार हाकालपट्टी?