न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या तिरंगी टी20 मालिकेत गुरूवारी (13 ऑक्टोबर) सहावा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (PAKvBAN) यांच्यात खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने एक चेंडू आणि सात विकेट्स शिल्लक राखत जिंकला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध उत्तम खेळी करताना पुन्हा एकदा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या एका विक्रमाला मागे टाकले आहे.
बाबर आझम (Babar Azam) याने बांगलादेशविरुद्ध 40 चेंडूत 55 धावा केल्या. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11000 धावांचा आकडा पार केला. सर्वात कमी डावात 11000 आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या आशियाई खेळाडूंच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकले आहे. या सामन्याआधी बाबरने 10987 धावा केल्या होत्या.
बाबरने आतापर्यंतच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 3122 धावा कसोटीमध्ये, 4664 धावा वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3216 धावा केल्या आहेत. विराटचा विक्रम मोडण्याची बाबरची ही काही पहिलीच वेळ नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000चा टप्पा गाठताना विराटला मागे टाकले होते. बाबरने 251 डावांमध्ये तर विराटने 261 डावांमध्ये 11000 धावा पूर्ण केल्या आहेत.
The skipper compiles 29th T20I fifty 👏
Pakistan bring up the 1️⃣0️⃣0️⃣ inside 12 overs 🏏#PAKvBAN | #NZTriSeries pic.twitter.com/LcU3nN240x
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 13, 2022
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा बाबरने मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्यासोबत पाकिस्तानच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 76 चेंडूत 101 धावांची भागीदारी रचली. त्याआधी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सहा विकेट्स गमावत 173 धावा केल्या. पाकिस्तानने 19.5 षटकात तीन विकेट्स गमावत 177 धावा करत सामना जिंकला. मोहम्मद नवाज 20 चेंडूत 45 धावा करत नाबाद राहिला.
4️⃣5️⃣ not out
2️⃣0️⃣ balls
5️⃣ fours
1️⃣ sixA scintillating knock from @mnawaz94 🔥#PAKvBAN | #NZTriSeries pic.twitter.com/Lpsoct2QKN
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 13, 2022
पाकिस्तानचा हा या मालिकेतील तिसरा विजय ठरला आहे. तसेच यजमान संघ न्यूझीलंडनेदेखील 3 सामने जिंकले आहेत. यामुळे गुणतालिकेत न्यूझीलंडने पहिले आणि पाकिस्तानने दुसरे स्थान गाठले आहे. यामुळे या मालिकेतील अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 14 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. हे सर्व सामने ख्राईस्टचर्च येथे खेळले गेले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | वॉर्नरच्या डोक्याला झाली असती गंभीर दुखापत, सुदैवाने थोडक्यात निभावलं
टी20 विश्वचषकात ‘याच’ टीमची चर्चा! अवघ्या सहा देशांच्या खेळाडूंचा मिळून तयार झाला संघ