ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) महासंग्राम काही दिवसांतच सुरू होणार आहे. पुरूषांच्या या आठव्या टी20 विश्वचषकात खेळणारे 16 संघ ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. काहींनी तर सराव सामने देखील खेळले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये गट ए आणि गट बी चे सामने झाल्यावर सुपर 12चे सामने होणार आहेत. तर क्रिकेटविश्वात सध्या एका संघाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा संघ सहा देशांच्या अकरा खेळाडूंंनी आपला एक वेगळाच संघ तयार केला आहे.
हा विश्वचषक सुरू होण्याआधीच काही खेळाडू चर्चेत आले आहेत. ज्या अकरा खेळाडूंनी आपला संघ तयार केला आहे त्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता हे अकरा खेळाडू कोण आहेत? त्यांची नावे जाणून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल की हा संघ खरोखर किती मजबूत आणि ताकदवान आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे की नाही?
एखादा क्रिकेट सामना होतो तेव्हा एका संघात अंतिम अकरा खेळाडू असतात. तसेच टी20 विश्वचषकातही न खेळणाऱ्या खेळाडूंनी आपला अंतिम अकरा जणांचा संघ तयार केला आहे. यामध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत या संघाचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. तसेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा देखील एक खेळाडू अंतिम अकरामध्ये आहे, तर वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.
यातील काही खेळाडू दुखापतीमुळे तर काही कामगिरीमुळे, फिटनेसमुळे संघात आपले स्थान कायम ठेवू शकले नाही.
टी20 विश्वचषक 2022 ची ‘मिसिंग प्लेइंग इलेव्हन’-
जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), शिमरॉन हेटमायर (वेस्ट इंडिज), रासी व्हॅन डर ड्युसेन (दक्षिण आफ्रिका), शोएब मलिक (पाकिस्तान), आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज), रवींद्र जडेजा (भारत), ड्वेन प्रिटोरियस (दक्षिण आफ्रिका), जसप्रीत बुमराह (भारत), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), नॅथन एलिस (ऑस्ट्रेलिया) आणि सुनील नरेन (वेस्ट इंडिज).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे हे काय! ग्लेन मॅक्सवेलमुळे वाढली ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी, पाहा मागच्या सहा सामन्यांतील आकडेवारी
जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद