पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2022 मधील सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानचा रिव्ह्यू घेतला त्यावेळी बाबर आझम म्हणाला की, “मी संघाचा कर्णधार आहे.”
खरे तर 16व्या षटकात पाकिस्तानी संघाने विकेट्सच्या मागे झेल घेतल्याची अपिलकेली. यष्टिरक्षक खेळाडू मोहम्मद रिझवानला खात्री होती की चेंडू बॅटच्या काठाने त्याच्याकडे आला आहे. पंचांनी त्याची अपील मान्य केले नाही आणि नाबाद घोषित केले. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंच्या आवाहनावर अंपायरने डीआरएसचे संकेत दिले. यामुळे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला आनंद झाला नाही आणि तो अंपायरच्या दिशेने आला आणि म्हणाला की कर्णधार मी आहे, बाकीच्या खेळाडूंच्या आवाहनावर तुम्ही डीआरएसचा निर्णय का दिला. यावेळी बाबर आझम आणि अंपायर दोघेही हसताना दिसले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘श्रीलंका संघाचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षाही सर्वश्रेष्ठ!’ माजी दिग्गजाने गायले संघभावनेचे गोडवे
निराशाजनक! पाकिस्तानी संघाच्या प्रदर्शनावर माजी दिग्गज नाराज; म्हणाला, ‘आता जागे व्हा…’