पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बाबरने महत्वपूर्ण प्रदर्शन केले आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या सामन्यातील प्रदर्शनाचा फायदा बाबर आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत होताना दिसला आहे. बाबरच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने पहिल्या डावात ११९ आणि दुसऱ्या डावात ५५ धावांचे योगदान दिले होते. पहिल्या डावात पाकिस्तानने २१८ धावांची खेळी होती, ज्यापैकी अर्ध्या धावा एकट्या बाबरच्या होत्या. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर बाबर आता कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बाबरच्या या प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ (Steve Smith) याला नुकसान सोसावे लागले आहे. स्मिथ आता कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. रुटकडे एकूण ९२३ रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन आहे, ज्याच्याकडे ८८५ रेटिंग पॉइंट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मजल मारणाऱ्या बाबरकडे आता ८७४ रेटिंग पॉइंट्स झाले आहेत. तर ८४८ रेटिंग पॉइंट्ससह स्मिथ चौथ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बाबर आझमच्या तापडतोड फलंदाजीमुळे पाकिस्तानचा विजय सोपा झाला. पाकिस्तानने हा सामना ४ विकेट्सने जिंकला.
बाबरने काही दिवसांपूर्वी अशी इच्छा व्यक्त केली होती की, त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये क्रमांक एकचा फलंदाज बनायचे आहे. कसोटी क्रमवारीत सुधारणा करून बाबर या स्वप्नाच्या अजून जवळ पोहोचला आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत बाबरने आधीपासूनच पहिल्या क्रमांकावर कायम आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकटेमधील सर्वोत्तम फलंदाज असणारा विराट कोहली सध्या कसोटी क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा या यादीत ९ व्या तर रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बेअरस्टोचा WWE सुपरस्टार अवतार! मात्र, पुढे घडली दुर्दैवी घटना; पाहा व्हिडिओ
‘नवनवीन पद्धतींनी पराभूत होतोय संघ’, तिसऱ्या वनडेपूर्वी विंडीज कर्णधाराची महत्वपूर्ण प्रतिक्रिया
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला