पाकिस्तान क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याने असे काही केले आहे, ज्याने सर्वांनाच अचंबित केले आहे. सध्या क्रिकेटच्या तिन्ही विभागात पाकिस्तान संघाचा कर्णधार असलेला आझम लाहोर येथे नेट प्रॅक्टिसदरम्यान आपल्या छोट्या भावाला घेऊन आला होता. ज्यानंतर पाकिस्तान बोर्डाने त्याला आपल्या धोरणांची आठवण करून दिली आहे.
आझम त्याचा भाऊ सफीर आझमला (Babar Azam Brother) नेट प्रॅक्टिससाठी घेऊन आला होता, ज्याचा फोटोही त्याच्या भावाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या फोटोत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी आझमच्या भावाला गोलंदाजी करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर पाकिस्तान बोर्डाने आझमला फटकारले (PCB Slammed Babar Azam)आहे.
काय सांगतात पीसीबीची धोरणे?
पाकिस्तान बोर्डाच्या उच्च प्रदर्शन केंद्राशी (हाय परफॉरमन्स सेंटर, एचसीपी) जोडल्या गेलेल्या धोरणांमध्ये असे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, फक्त पाकिस्तानचे खेळाडू, प्रथम श्रेणी किंवा ज्यूनियर क्रिकेटपटूच अधिकाऱ्यांच्या परवानगीने केंद्राच्या सुविधा आणि कर्मचाऱ्यांचा उपयोग करू शकतात. परंतु कोणत्या खेळाडूने आपल्या कोणत्या नातेवाईकाला किंवा मित्रांना सरावासाठी एचसीपीत आणण्याची परवानगी नाहीय.
— Safeer Azam (@safeerazam10) May 14, 2022
माध्यमांतील वृत्तांनुसार, आझम ३-४ दिवसांपूर्वी आपल्या भावासोबत एचसीपीमध्ये आला होता. ही घटना अनुकूलन शिबिर सुरू होण्यापूर्वीची होती. त्याच्या भावाने नंतर नेटमध्ये सरावही केला. ही गोष्ट बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर आझमला विनम्रतेने त्याच्या चुकीची जाणीव करून दिली गेली. तसेच पुन्हा अशी चूक न करण्याचा सल्लाही दिला गेला आहे. आझमने आपली चूक कबूल केली आहे.
पाकिस्तानच्या कर्णधाराची कारकिर्द
दरम्यान आझम पाकिस्तानच्या कसोटी, वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानकडून ४० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४५.९८च्या सरासरीने २८५१ धावा निघाल्या आहेत. तसेच त्याने यादरम्यान ६ शतके आणि २१ अर्धशतकेही केली आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने ८६ सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्त्व केलेय, ज्यामध्ये त्याने ५९.१८च्या सरासरीने ४२६१ धावा फटकावल्या आहेत. तसेच टी२० क्रिकेटमध्ये ७४ सामने खेळताना २६८६ धावा त्याच्या खात्यात आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ रोहितची आणि दिनेश कार्तिकच्या करीयरची गाडी रुळावर आणणारा ‘अभिषेक नायर’