बांग्लादेशने काल (03 सप्टेंबर) मंगळवारी दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे बांग्लादेशने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून ऐतिहासिक विजय नोंदवला. पाचवा म्हणजेच शेवटच्या दिवसाचा खेळ झाला तेव्हा बांग्लादेशला 143 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे 10 विकेट सुरक्षित होत्या. बांग्लादेशने 4 गडी राखून लक्ष्य गाठले. अशा प्रकारे बांग्लादेशने 2-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आता बाबर आझमसह आणि इतर फलंदाज सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत.
बाबर आझम बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सपशेल फ्लॉप ठरला. दरम्यान, या लाजिरवाण्या कामगिरीदरम्यान पाकिस्तानचे माजी मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीमने बाबर आझमबाबत खळबळजनक विधान केले आहे. मोहम्मद वसीमने बाबर आझमला हट्टी म्हटले आहे. ते म्हणाले की बाबर आझम खूप हट्टी होता आणि त्याने अनेकदा निवड समितीच्या सूचनांचा विरोध केला आहे. आता मोहम्मद वसीमचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय बाबर आझम यांच्यावर टीकाकार सतत प्रतिक्रिया देत आहेत. तसेच मोहम्मद वसीमचे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
मोहम्मद वसीमला डिसेंबर 2020 मध्ये मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले होते आणि डिसेंबर 2022 मध्ये जवळजवळ दोन वर्षांनी काढून टाकण्यात आले होते. त्याचवेळी, एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, यानंतर बाबर आझमला टी20 विश्वचषक 2024 पूर्वी लिमिटेड फाॅरमॅट क्रिकेटचे कर्णधारपद देण्यात आले. तर कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद शान मसूदकडे आहे.
बांग्लादेश संघाबद्दल बोलायचे झाल्यास, संघाचा आता भारत दाैरा आहे. ज्यामध्ये संघाला 2 कसोटी तर 3 टी20 सामने खेळायचे आहेत. ज्यासाठी भारतीय संघ तयारी करत आहे. नुकतेच आलेल्या अहवालानुसार पुढील आठवड्यात बांग्लादेश मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर पाहुण्या बांग्लादेशच्या संघाकडे मात्र सगळ्यांचा लक्ष आहे. बोर्ड आता पाकिस्तान विरुद्धचा संघ पाठवतो की यामध्ये काही बदल करते. हे पाहणे रंजक राहील. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.
हेही वाचा-
युवराज सिंगच्या वडीलांना एमएस धोनीचा तिरस्कार का? जाणून घ्या तीन कारणे
बांग्लादेश मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा; मोठी अपडेट समोर
“झेंडा ऊंचा रहे हमारा”, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी!