टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये भारताचा शेजारी देश पाकिस्तानला सुपर 12मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना झिम्बाब्वेसारख्या कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघाकडून झालेला हा पराभव गळ्याच्या खाली उतरत नाहीये. या पराभवाचा दोषी बाबर आझम याला ठरवले जात असल्याने त्याच्यावर प्रंचड टीका केली जात आहे. त्यामुळेच त्याने झिम्बाब्वेविषयी केलेले जुने ट्वीटही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे काही वर्षांपूर्वीचे ट्वीट खुप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्वीटवरून नेटकरी त्याची प्रचंड खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानच्या या सलामीवीराने हे ट्वीट 2015 मध्ये केलेलं. या दरम्यान त्याने ट्वीट करत लिहिलेलं की ‘आपले स्वागत आहे झिम्बाब्वे’. यामध्ये त्याने झिम्बाब्वेची स्पेलिंग चुकीची लिहिलेली.
टी20 विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या पराभवामुळे चाहत्यांनी बाबरला आपल्या निशाण्यावर घ्यायला सुरू केली. एका चाहत्याने लिहिलय की,” तू जी झिम्बाब्वेची स्पेलिंग चुकीची लिहिली आहेस त्यांनी त्याचाच बदला घेतला आहे.”
https://twitter.com/TatyaVinc/status/1585894938205892608?s=20&t=kF_MCnT0f9ZffuecJ_UOZQ
दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलयं की,”ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावरून पाकिस्तानच स्वागत आहे.”
Welcome Pakistan From Australia airports..
— 𝚂𝙰𝚁𝙰𝙽ᵛⁱʳᵃᵗ^🇦🇷🔥 (@Itz_Saranvj) October 27, 2022
तर एका अन्य नेटकऱ्याने लिहिलय की,” स्वागत आहे झिम्बार्बर.”
Welcome Zimbarber
— shashank (@ravia123ash) October 27, 2022
एका प्रशंसकाने मात्र संघाचे धाडस वाढवल आहे. त्याने लिहिलय की,” ही वेळ देखील निघून जाईल हिमंत हरू नका.”
https://twitter.com/svgjz/status/1585659587243704320?s=20&t=8Jr9U0x3sn3lll7yhZYD0w
काय झालेले पाकिस्तान विरूद्ध झिम्बाब्वे सामन्यात?
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12च्या सामन्यात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे गुरूवारी (27 ऑक्टोबर) एकमेकांना भिडले. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पाॅवरप्लेमध्ये झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी 2 गडी गमावतं 47 धावा केल्या. मात्र, नंतर धावगती संथ पडली आणि त्यांना 20 षटकांमध्ये 130 धावा बनवता आल्या.
झिम्बाब्वेसाठी सीन विलियम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या. झिम्बाब्वेने दिलेल्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला 129 धावांपर्यंतच मजल मारता आली. शान मसूदने 38 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्याची ही संयमी खेळी व्यर्थ झाली आणि पाकिस्तानला अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेंटरबरोबर बॅटींग कोच एमएस धोनी! हार्दिक पंड्या-रिषभ पंतला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
‘आऊट ऑफ फॉर्म’ केएल राहुल विराट कोहलीच्या वाटेवर, ‘या’ व्यक्तिकडून मागितला गुरुमंत्र!