ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची समाप्ती रविवारी (13 नोव्हेंबर) होईल. मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर येतील. पाकिस्तान संघाला 14 वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याची संधी असेल. त्याचवेळी पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझम याच्याविषयी भारताचे सर्वकालीन महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
पाकिस्तान संघ या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर 1992 मधील वनडे विश्वचषकावेळीच्या अनेक योगायोगांची चर्चा होत आहे. त्या योगायोगांचा संदर्भ देताना सुनील गावस्कर यांनी गमतीदार टिप्पणी केली. गावसकर म्हणाले,
“पाकिस्तान संघ शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचलाय. त्यांच्या या प्रवासापेक्षा 1992 विश्वचषकावेळीच्या योगायोगाची अधिक चर्चा होतेय. त्याच योगायोगांना आधार मानले तर, पाकिस्तान विजेता बनल्यास कर्णधार बाबर आझम 2048 मध्ये पाकिस्तानचा प्रधानमंत्री बनेल.”
पाकिस्तानला 1992 मध्ये विजेतेपद मिळवून देणारे इम्रान खान 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते. त्यामुळे बाबर याच्याबद्दल गावसकरांनी हे विधान केले.
सन 1992 मधील विश्वचषक हा देखील ऑस्ट्रेलियात आयोजित केला गेला होता. त्यावेळी पाकिस्तानला साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने, तर यावेळी भारताने पराभूत केले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने मेलबर्न येथील एमसीजीवर खेळले गेलेले. या दोन्ही वेळी साखळी फेरीत पाकिस्तानला भारताकडून पराभूत व्हावे लागलेले.
या दोन्ही विश्वचषकातील आणखी एक योगायोग म्हणजे यजमान ऑस्ट्रेलिया दोन्ही वेळी साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. तसेच या दोन्ही वेळी पाकिस्तानी आपले अखेरचे तीनही साखळी सामने जिंकले होते. तर, बाद फेरीसाठी पात्र होण्याकरिता त्यांनी दोन्ही वेळी आपल्यापेक्षा खालच्या क्रमांकावर असलेल्या संघापेक्षा केवळ एक गुण जास्त घेतला. याव्यतिरिक्त, उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला धावांचा पाठलाग करत असतानाच पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.
(Babar Azam Will Become Pakistan PM In 2048 Gavaskar Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”