भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये आतापर्यंत अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व चारही सामने जिंकून टीम इंडियाने दिमाखात ‘सुपर-8’ मध्ये प्रवेश केला आहे. आता सुपर-8 फेरीतील भारताचा पुढचा सामना आज म्हणजेच 22 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा सलामीवीर अभिषेक शर्मावर (Abhishek Sharma) असतीलच, पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या tilak verma) वर्माकडे एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे. हा पराक्रम करण्यासाठी त्याला केवळ 4 धावांची गरज आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिलक वर्माची बॅट नेहमीच तळपली आहे. आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या 10 टी20 सामन्यांत त्याने 70.85 च्या सरासरीने 496 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. जर या सामन्यात टिळकने केवळ 4 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये 500 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल.
आतापर्यंत जगात फक्त तीनच फलंदाजांनी आफ्रिकेविरुद्ध 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) (526 धावा) याचा समावेश आहे. जर तिलकने या सामन्यात 31 धावा केल्या, तर तो बाबर आझमलाही मागे टाकेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
जोस बटलर (इंग्लंड) – 606
बाबर आझम (पाकिस्तान) – 526
जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) – 501
तिलक वर्मा (भारत) – 496
या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतच्या चारही सामन्यांत तिलक वर्माला फलंदाजीची संधी मिळाली, पण त्याला अद्याप अर्धशतक झळकावता आलेले नाही. पहिल्या तीन सामन्यांत त्याने प्रत्येकी 25 धावा केल्या, तर नेदरलँडविरुद्ध 31 धावांची खेळी केली. त्यामुळे सुपर-8 च्या या महत्त्वाच्या सामन्यात तिलक वर्माकडून एका मोठ्या आणि मॅचविनिंग खेळीची सर्वांना अपेक्षा आहे.






