सोमवारी (दि. 17 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 24व्या सामन्यात तिसऱ्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात लढत झाली. हा सामना चेन्नई संघाने 8 धावांनी आपल्या खिशात घालत स्पर्धेतील तिसरा सामना जिंकला. चेन्नईच्या या विजयात श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज तसेच हंगामातील पहिला सामना खेळणारा मथिशा पथिराना याचा मोलाचा वाटा डेथ ओवर्समध्ये त्याने टिच्चून गोलंदाजी केल्याने चेन्नईला विजय साकारता आला. त्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, त्याने आपल्या या कामगिरीचे श्रेय संघाचा कर्णधार एमएस धोनी याला दिले आहे.
हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या पथिरानाने अखेरच्या षटकांत उत्कृष्ट गोलंदाजी करताना 18 व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या. त्यानंतर 20 व्या षटकात 11 धावा देत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
”पहिल्या दोन षटकात 28 धावा गेल्याने मी बैचेन झालो होतो. मात्र, त्यावेळी धोनीने मला सल्ला देताना म्हटले, शांत रहा फार विचार करू नको. केवळ तुझी सर्वश्रेष्ठ गोलंदाजी करण्यावर लक्ष दे.”
पथिराना याची गोलंदाजीची शैली श्रीलंकेचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यासारखी असल्याने त्याला बेबी मलिंगा म्हणून ओळखले जाते
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. सीएसकेसाठी डेवॉन कॉनवे व शिवम दुबे यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला 218 धावाच करता आल्या. यावेळी फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी वादळी फलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी ती पुरेशी नव्हती. या दोघांव्यतिरिक्त दिनेश कार्तिक व सुयश प्रभुदेसाई यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, पथिराना याच्या अचूक गोलंदाजीमुळे आरसीबीला विजय मिळवता आला नाही.
(Baby Malinga Matheesha Pathirana Give His Success Credit To MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! माजी रणजीपटूचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
अर्जुनच्या कामगिरीची प्रीती झिंटालाही भुरळ; ट्वीट करत म्हणाली, ‘नेपोटिझममुळे खिल्ली उडवली गेली, पण…’