2026 मध्ये भारताचा इंग्लंड दौरा होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. सध्या भारताची इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पण यंदा 2025 मध्ये मर्यादित षटकांची मालिका होणार नाही. पण पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या मैदानावर टी20 आणि वनडे सामने खेळताना दिसणार आहे. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे. विशेष म्हणजे या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील खेळताना दिसू शकतात.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील सध्या सुरू असलेली कसोटी मालिका चांगल्याच रंगतदार टप्प्यावर आली आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकूण 8 मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील. पुढील वर्षी जुलै महिन्यात या मालिकेचं आयोजन निश्चित करण्यात आलं आहे. या मालिकेत 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड – टी20 मालिका (5 सामने)
पहिला टी20 – 1 जुलै 2026
दुसरा टी20 – 4 जुलै 2026
तिसरा टी20 – 7 जुलै 2026
चौथा टी20 – 9 जुलै 2026
पाचवा टी20 – 11 जुलै 2026
भारत विरुद्ध इंग्लंड – वनडे मालिका (3 सामने)
पहिला वनडे – 14 जुलै 2026
दुसरा वनडे – 16 जुलै 2026
तिसरा वनडे – 18 जुलै 2026
रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर दोघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला होता. सध्या ते फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे 2026 मध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसू शकतात. आता दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे सक्रिय नाहीत, त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांचा फॉर्म टिकून राहतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






