इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार देखील पहायला मिळत आहे. याबरोबरच रणजी ट्रॉफीत चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना सुरू आहे.
याबरोबरच, बीसीसीआयने भारताच्या अनेक स्टार खेळाडूंना सध्या एक मोठा धक्का दिला आहे. कारण बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे भारताचे स्फोटक फलंदाज इशान किशन, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयची नवीन घोषणा काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या राजकोट कसोटीदरम्यान जय शाह यांनी एक आदेश काडून स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट हा महत्त्वाचा निकष बनला असून त्यात सहभागी न झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा जयशहा यांनी सर्वोच्च क्रिकेटपटूंना पत्र लिहून दिला आहे.
अशातच गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच टीम इंडियात निवड होण्यासाठी आयपीएल हा सर्वात मोठा आधार बनला होता. या कारणामुळे देशांतर्गत क्रिकेटचे मूल्य कमी होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सचिवांनी नवा आदेश जारी केला आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याने स्वतःच्या इच्छेने क्रिकेटमधून ब्रेक घेतला. यानंतर त्याने बीसीसीआय, संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि आपल्या घरच्या रणजी संघाला कोणतीही अपडेट दिली नाही. इशानचा प्लॅन काय आहे हे कोणालाच माहीत नाही. घरच्या संघाकडून तो रणजी करंडकही खेळला नव्हता. इशानच्या या वृत्तीने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन चांगलेच संतापलेले पहायला मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : लंच-ब्रेकनंतर इंग्लंड 319 वर ऑलआऊट, टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी
- IND vs ENG: टीम इंडियासमोर जो रूट फ्लॉप! रिव्हर्स स्कूप मारत केले स्वतःचे नुकसान, पाहा व्हिडिओ