आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. या सामन्यात सीएसके संघाने 5 गड्यांनी विजय मिळवला होता. या सामन्यात अंबाती रायडूने शानदार फलंदाजी केली होती. मात्र राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत संघाने हा सामना 16 धावांनी गमावला होता.
अंबाती रायडूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यालाही मुकणार आहे.
मुंबई विरुद्ध खेळली शानदार खेळी
मुंबईविरुद्धच्या सामन्यात अंबाती रायडूने 71 धावांची खेळी खेळून संघाला सामना जिंकून देण्यात महत्वपूर्ण वाटा निभावला होता. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळवलेला ऋतुराज गायकवाड खाते न उघडताच बाद झाला होता. मुंबई विरुद्धच्या सामन्यात रायडूला ही दुखापत झाली होती.
त्याचबरोबर सीएसकेच्या संघाला आशा आहे की अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आणि अंबाती रायडू ठीक होतील आणि लवकरच चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध होईल. गुडघ्याचा दुखापतीमुळे ब्राव्होने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
विशेष म्हणजे सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान युवा फलंदाज संजू सॅमसन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीमुळे सीएसकेच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, दिल्लीविरुद्धच्या तिसर्या सामन्यात संघाला विजय मिळवायचा आहे. सीएसके संघाला आपला चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 2 ऑक्टोबरला खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर
-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….