क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो.फक्त निकालाबाबत नव्हे तर इतर बाबतीतही क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी अनिश्चित असतात. याचाच प्रत्यय आज पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात आला. बरोबर १३ वर्षांपूर्वी पाकिस्तान दौ-यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघासमोर ‘बॉल बॉय’ म्हणून मैदानात असलेल्या बाबर आझमने आज त्याच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पाकिस्तानचा कसोटी कर्णधार म्हणून मैदानात पाऊल ठेवले. बाबरच्या या अनोख्या कामगिरीची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर होती.
मायदेशात प्रथमच नेतृत्व करत आहे बाबर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत बाबर प्रथमच मायदेशात कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. मागील महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो कर्णधार होता. मात्र, दुखापतीमुळे तो मालिकेत खेळू शकला नाही. आता पाकिस्तानमध्ये नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी बांगलादेशने पाकिस्तानचा दौरा केला होता. त्याआधी श्रीलंकेने देखील पाकिस्तानात जाऊन कसोटी मालिका खेळलेली.
पहिल्या डावात अपयशी ठरला बाबर
बाबर सध्या पाकिस्तानच्या तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार आहे. सध्या बाबरचा समावेश जगातील सर्वोत्तम फलंदाजांत होतो. तो फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत दुसऱ्या, वनडे क्रमवारीत तिसऱ्या तर कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कराची येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात मात्र तो अवघ्या सात धावा काढून तंबूत परतला. केशव महाराजने त्याला बाद केले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात केलेल्या २२० धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची पहिल्या दिवसाअखेर ४ बाद ३३ अशी नाजूक अवस्था झाली आहे.
तेरा वर्षानंतर पाकिस्तानात खेळत आहे दक्षिण आफ्रिका
श्रीलंका संघावर २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. २०१५ पासून काही सहयोगी संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिका संघाने २००७-२००८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर २०१०-२०११ व २०१३-२०१४ या दोन दौर्यात युएई येथे पाकिस्तानशी दोन हात केले.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल २०२१: सलग २ वर्षे फ्लॉप ठरलेल्या मॅक्सवेलसाठी यंदा लागणार १० कोटींची मोठी बोली !
या खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज