लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे चेंडू छेडछाडीबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
झाले असे की चौथ्या दिवशी या सामन्यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये इंग्लंडचे दोन खेळाडू त्यांच्या बुटांनी चेंडूशी खेळत आहेत. त्यांच्या बुटांना स्पाइक्सही आहेत. हे खेळाडू नक्की कोण आहेत, याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना सॅम करन ३४ व्या षटकात गोलंदाजी करत होता, त्यावेळी थेट प्रेक्षेपणात इंग्लंडचे खेळाडू चेंडूशी बुटांनी खेळत असतानाची दृश्य दाखवण्यात आली. यावेळी खेळाडूंचे चेहेरे दाखवले गेले नाहीत.
पण, या घटनेचे फोटो व्हायरल होताच, चाहत्यांनी इंग्लंड खेळाडू चेंडूशी छेडछाड करत आहेत का?, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेकांनी हे जाणूनबुजून केले होते का?, असेही प्रश्न विचारले आहेत.
एवढेच नाही तर, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील ‘चेंडू छेडछाड?’ असे ट्विट केले आहे. तसेच विरेंद्र सेहवागनेही याबद्दल ट्विट करत लिहिले की ‘हे काय होत आहे. इंग्लंडकडून चेंडूशी छेडछाड की कोविड नियमांचे पालन’
असे असले तरी, आता ही घटना चेंडू छेडछाडीचीच आहे की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच खेळाडू मुद्दाम चेंडूशी अशाप्रकारे खेळत होते की त्यांच्याकडून नकळत चेंडू थांबवताना असे कृत्य झाले, हे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत.
Ball tampering, eh? #EngvInd
— Aakash Chopra (@cricketaakash) August 15, 2021
Yeh kya ho raha hai.
Is it ball tampering by Eng ya covid preventive measures 😀 pic.twitter.com/RcL4I2VJsC— Virender Sehwag (@virendersehwag) August 15, 2021
Epic display of sportsmanship from the sanctimonious poms yet again #ENGvIND @elitecynic @cricrohit pic.twitter.com/7VM7zVJDDC
— Pranav Ramakanthan (@duality_pranav) August 15, 2021
Ball Tampering 👀 #INDvENG #IndvsEng #ENGvIND #ENGvsIND #BallTempering #IndiaAt75 pic.twitter.com/xXhXs8Bre8
— GURI CHAUDHARY (@GuriChaudhary77) August 15, 2021
Ball tampering? pic.twitter.com/VUNCnpFxTX
— DK (@ViratCrazyDK) August 15, 2021
Spikes on the cricket ball… Another way of ball tampering?? England now? #IndvsEng @ECB_cricket @BCCI #Balltampering pic.twitter.com/0fv3cSSPCX
— mark rufus (@markrufus007) August 15, 2021
There was talk of morality yesterday at lords when a bowler was bowling bouncers to a batsman with full gear helmet and pads.
This though brought a chuckle in the ground. pic.twitter.com/HTGJ9dLcBo
— Guru Gulab (@madaddie24) August 15, 2021
Thats surely not allowed?
He's simply stood on the ball & pushed the spikes in.@bhogleharsha @sanjaymanjrekar #ENGvsIND #ENGvIND
— 𝘼𝙗𝙝𝙞𝙟𝙚𝙚𝙩 👍🏼 (@ab_nufc) August 15, 2021
दरम्यान, सामन्याचा विचार करायचा झाल्यास भारताने पहिल्या डावात केएल राहुल (१२९) आणि रोहित शर्माच्या (८३) खेळींच्या जोरावर ३६४ धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात जो रुटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत ५३ षटकांत ३ बाद १०५ धावा केल्या असून ७८ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी टोकियो आलिंपिक खेळण्याची आशा सोडलेल्या नीरज चोप्राने भावनिक पोस्ट करत मानले ‘यांचे’ आभार
“मला वाटलं आता गाणंच लावतील”, थर्ड अंपायरने ‘ती’ चूक करताच चाहत्यांनी घेतली मजा