---Advertisement---

ट्विटरवर सुरू झाला बॅन आयपीएल ट्रेंड; चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 11:42 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ८ गड्यांनी पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय संघाला सोशल मीडियावर चांगले ट्रोल केले जात आहे. काही चाहत्यांनी तर भारताच्या या पराभवास आयपीएल जबाबदार असल्याचे म्हणत ट्विटरवर बॅन आयपीएल हा ट्रेंड चालवला.

भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव
विश्वचषक मोहिमेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून तब्बल १० गड्यांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दुबई येथे रविवारी (३१ ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ गड्यांनी लोळवले. या पराभवामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा अंधुक झाल्या आहेत. भारताला उर्वरित तीनही सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच, इतर सामन्यांच्या निकालावरही भारतीय संघाचे लक्ष असेल.

ट्विटरवर सुरु झाला ट्रेंड
सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले आहे. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांपेक्षा आयपीएल खेळण्यात धन्यता मानत असल्याचे म्हणत अनेकांनी बॅन आयपीएल हा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला. एका चाहत्याने सलामीवीर केएल राहुलची यावर्षीची आंतरराष्ट्रीय टी२० मधील व आयपीएलमधील कामगिरी किती वेगळे असल्याचे ट्विट केले.

दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘भारतीय खेळाडूंचे सर्व लक्ष देशापेक्षा पैशावर पैशावर असते’

अन्य एका ट्विटर वापरकर्त्याने लगान या प्रसिद्ध चित्रपटातील संघाची तुलना भारतीय संघाशी करत त्या संघाला वरचढ म्हटले.

धोनी आणि रवी शास्त्री यांना धरले धारेवर
अन्य काही चाहत्यांनी प्रशिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या रवी शास्त्री यांना तसेच या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटर बनवण्यात आलेल्या माजी कर्णधार एमएस धोनी यांना लक्ष केले. या दोघांची रणनीती अत्यंत कुचकामी असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---