बांग्लादेश संघाने 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वेस्ट इंडिजच्या भूमीवर पहिला कसोटी सामना जिंकला आहे. एवढेच नाही तर बांग्लादेश संघाने परदेशी भूमीवर गेल्या 6 पैकी तीन सामने जिंकले आहेत. यातील दोन सामने बांग्लादेशने पाकिस्तानच्या भूमीवर जिंकले. मात्र, त्यानंतर भारताविरुद्ध सलग दोन सामने हरले आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत एक सामना गमावला. आता पुन्हा संघ विजयी मार्गावर परतले आहे. या विजयासह बांग्लादेश यजमान वेस्ट इंडिज संघासोबत बरोबरी साधली. वेस्ट इंडिजचा संघ दोन्ही डावात 200 धावाही पार करू शकला नाही.
पहिल्यांदाच बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका अनिर्णित राहिली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 11 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी बांग्लादेशने दोन मालिका जिंकल्या आहेत आणि उर्वरित 8 मालिका वेस्ट इंडिजने जिंकल्या आहेत. मात्र यंदाची (2024) ही मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. बांगलादेशने शेवटचा कसोटी सामना 2009 मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर जिंकला होता. त्यादरम्यान संघाने दोन्ही सामने जिंकले आणि मालिकाही जिंकली. मात्र, यानंतर बांग्लादेश संघ वेस्ट इंडिजकडून सलग सात सामने हरला होता.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांग्लादेश संघाने पहिल्या डावात खेळताना 164 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत बांग्लादेशला पुन्हा पराभवाचा धोका होता. पण नाहिद राणाने पाच विकेट्स घेत वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 146 धावांत रोखले. यानंतर बांग्लादेशचा दुसरा डाव आला तेव्हा त्यांनी 268 धावा केल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला 286 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याच्या प्रत्युत्तरात कॅरेबियन संघ 185 धावा करून गडगडला आणि अशा प्रकारे बांग्लादेशने 101 धावांच्या फरकाने सामना जिंकून कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजसोबत 1-1 ने बरोबरी साधली.
हेही वाचा-
IND vs AUS: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल निश्चित, रोहित शर्मा हा मोठा निर्णय घेणार का?
लय भारी! सीएसकेला मिळाला धोनीचा मराठमोळा उत्तराधिकारी!
5 संघांनी खेळले सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने, पाकिस्तानने रचला इतिहास…!