---Advertisement---

ICCने घातली होती ‘या’ खेळाडूवर २ वर्षांची बंदी, आता संघाने केलीय स्वागताची जय्यत तयारी

---Advertisement---

बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनने आयसीसीने घातलेली दोन वर्षांची बंदी पुर्ण केली आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याची क्रिकेटमध्ये परतण्याची जय्यत तयारी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) आजवर अनेक खेळाडूंवर कारवाई करण्यात आली होती. मग तो कितीही मोठा स्टार खेळाडू का असेनात. एखाद्या प्रकरणात दोषी आढळून आल्यास आयसीसी त्यांच्यावर कारवाई करते. यात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वोर्नर देखील सुटले नाहीत. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू तसेच माजी कर्णधार शकीब अल हसन हा देखील सध्या शिक्षा भोगतोय. भ्रष्टाचार विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याने शकीबला दोन वर्ष निलंबित केले होते. त्याच्या शिक्षेचा कालावधी आता पूर्ण झाला असून बांगलादेश संघ त्याच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहे.

काय होते नेमके प्रकरण ?
शकीब उल हसन दोन वर्षांपूर्वी एका सामन्या दरम्यान एका भारतीय सट्टेबाजाच्या संपर्कात आला होता. सट्टेबाजासोबत त्याचे फोनवर संभाषण देखील झाले होते. पण याबद्दल त्याने अधिकाऱ्यांना कसलीही माहिती दिली नाही. पुढे जेव्हा कॉल रेकॉर्डिंग उघड झाली तेव्हा शकीब या प्रकरणात दोषी ठरला आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याने जरी फिक्सिंग केले नसले तरी सट्टेबाजाने त्याच्याशी संपर्क केल्याची माहिती त्याने दिली नव्हती.

शकीबच्या परतण्याची संघ पाहतोय वाट
वर्षभर क्रिकेट पासून दूर असलेला शकीब अल हसन संघात परतत असल्याने बांगलादेश क्रिकेटला नवे बळ आणि ऊर्जा मिळणार आहे. शकीबचा चाहता वर्ग देखील त्याच्या पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे. बांगलादेश संघ गेली काही महिने आंतरराष्ट्रीय सामने खेळला नाही. पुढेही संघाचे जास्त सामने होणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाकिबने देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष आबेदीन यांनी म्हटले आहे.

का महत्वाचा आहे शकीब अल हसन संघासाठी ?
शकीब अल हसन हा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आहे. आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत तिन्ही प्रकारात अव्वल स्थान मिळवणारा तो बांगलादेशचा एकमेव खेळाडू आहे. त्याने बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा व ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याने बांगलादेश संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. शकीब संघाचा एक उत्तम खेळाडू बनला असून भविष्यात तो संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीन मजबुती देऊ शकतो असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---