बांगलादेशने आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून, अनकॅप्ड तंजिद तमीमचा संघात समावेश करण्यात आला. त्याचवेळी मेहदी हसनचे दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
तंजिद तमिमबद्दल बोलायचे झाले तर नुकत्याच झालेल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत त्याची कामगिरी जबरदस्त होती. सलग तीन अर्धशतकी खेळ्या करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. बांगलादेशचा दिग्गज फलंदाज तमीम इक्बाल याला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच सलामीच्या जागेसाठी त्याची निवड केली गेली आहे.
अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची आशिया चषक स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. नुकतीच त्याला ही जबाबदारी देण्यात आली. तमिम इक्बालने राजीनामा दिल्यानंतर आशिया चषक आणि विश्वचषकासाठी शाकिबची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. शाकिबने याआधीही वनडेमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे. त्याने आतापर्यंत 50 वनडे सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. ज्यामध्ये 23 विजय आणि 26 पराभव अशी त्याची कामगिरी राहिली होती.
आशिया चषकासाठी बांगलादेश क्रिकेट संघ:
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजिद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शेख महेदी, नसुम अहमद, शमीम हुसेन, शोरफुल इस्लाम, शमीम हुसेन, आफिफ हुसैन, इबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
(Bangladesh Annouced Squad For Asia Cup Shakib Lead)
महत्वाच्या बातम्या –
आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला मोकळीक! विना प्रशिक्षक खेळणार टी20 मालिका
WIvsIND । विराटचा ऐतिहासिक विक्रम मोडणारा ‘हा’ फलंदाज, टी-20 मालिकेनंतर यादीत होणार मोठा फेरबदल!