---Advertisement---

आगामी विश्वचषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, महत्वाच्या फलंदाजाची टी२० मधून ६ महिन्यांसाठी विश्रांती

On: शुक्रवार, जानेवारी 28, 2022 12:07 AM
Tamim-Iqbal
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल (Tamim Iqbal) याने टी-२० क्रिकेटमधून (T-20 cricket) पुढच्या काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या सहा महिन्यांसाठी आता तमीम इकबाल बांगलादेशच्या टी-२० संघासोबत दिसणार नाही. अशात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात तो खेळताना दिसेल, याची खूपच कमी शक्यता आहे. परंतु बांगलादेश संघाला जर विश्वचषकात त्याची गरज असेल, तर तो स्वतःचा निर्णय बदलू शकतो.

ईएसपीएल क्रिकइंफोने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार तमीम म्हणाला की, “माझ्या टी-२० मधील भविष्यावर चर्चा झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन, जलाल यूनुस भाई आणि काजी इनाम अहमद यांच्यासोबत बैठका करत आहे. त्यांची इच्छा होती की, मी टी-२० मध्ये खेळत राहावे. यावर्षीचा विश्वचषक खेळावा, पण माझा एक वेगळाच विचार आहे. मी पुढच्या सहा महिन्यांसाठी टी-२० क्रिकेट खेळण्याचा विचार करणार नाहीय. माझे पूर्ण लक्ष कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर असेल.”

व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण

“आम्ही कसोटी अजिंक्यपद आणि २०२३ विश्वचषकासाठी क्वालिफाय करण्याची तयारी करत आहोत. मी पुढच्या ६ महिन्यांमध्ये टी-२० विषयी विचार करणार नाही. मला आशा आहे की, खेळणारे एवढे चांगले प्रदर्शन करतील की, टी-२० मध्ये माजी गरज नसेल. पण जेव्हा संघ किंवा क्रिकेट बोर्ड माझी गरज असेल, तर मी त्यासाठी उपलब्ध असेल,” असे तमीम पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशी माहिती समोर येत होती की, तमीम २०२३ एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर २०२३ पर्यंत टी-२० क्रिकेटमधून विश्रांती घेणार आहे. परंतु बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्याने आता स्वतःचा निर्णय बदलल्याचे दिसते. आता तो पुढच्या सहा महिन्यांसाठी टी-२० क्रिकेटमधून विश्रांती घेईल.

दरम्यान, तो मागच्या १२ महिन्यांपासून टी-२० क्रिकेटमधून शक्यतो लांब राहिल्याचे दिसले आहे. त्याने २०२० मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळला होता, जो जिम्बाब्वे संघाविरुद्ध होता. जिम्बाब्वेविरुद्धच्या या टी-२० मालिकेतील त्याला दुखापत झाली होती आणि पुढच्या तीन सामन्यांतून त्याने माघार घेतली होती. तमीमच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर ती चांगली राहिली आहे. त्याने बांगलादेशसाठी एकून ७८ टी-२० सामने खेळले आणि यामध्ये १७५८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ७ अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

विंडीजविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेत बुमराह पत्नीसंगे घालवतोय सुट्ट्या, नावेतील फोटो होतायत व्हायरल

‘या’ कारणामुळे मायदेशात वनडे, टी२० मालिका खेळण्यापासून मुकला अश्विन, विडिंजविरुद्ध बसाव लागलं बाहेर

मेगा लिलावात ‘या’ ४ यष्टीरक्षकांची होणार चांदी! आयपीएल फ्रँचायझी पाण्यासारखा ओततील पैसा

व्हिडिओ पाहा –

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---