---Advertisement---

बांगलादेशने स्वत:च भारताला दिली पुनरागमनाची संधी, माजी सलामीवीराने सांगितली कुठे झाली चूक?

On: गुरूवार, सप्टेंबर 19, 2024 9:09 PM
bangladesh hasan mahmood
---Advertisement---

IND vs BAN Test :- चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेश क्रिकेट संघाने एकवेळी भारतीय संघावर आपली पकड मजबूत केली होती. भारताचा डाव लवकरच कोसळेल आणि बांगलादेश यजमान संघाला 200 धावाही करू देणार नाही, असे वाटत होते. मात्र, खालच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने पाहुण्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आणि भारताची धावसंख्या 340 च्या जवळ नेली. बांगलादेशचा माजी सलामीवीर तमिम इक्बालने सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा संघ कुठे चुकला? हे सांगितले आहे.

भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विनने रवींद्र जडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 195 धावांची नाबाद भागीदारी केली. अश्विनने 108 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान कसोटी शतक आहे. यामुळे भारतीय संघ आता अतिशय मजबूत स्थितीत आला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा 86 धावा आणि रविचंद्रन अश्विन 102 धावांवर नाबाद राहिले.

तमिम इक्बालच्या म्हणण्यानुसार, शाकिब अल हसनला अधिक गोलंदाजी करायला लावली असती तर बांगलादेश संघाला त्याचा फायदा झाला असता. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या संवादात तो म्हणाला, “बांगलादेशने मोठी चूक केली. चेंडू नवीन असताना शाकीब अल हसनला आधी गोलंदाजी करायला द्यायला हवी होती. त्यावेळी खेळपट्टीमध्ये ओलावा होता आणि तेव्हा शाकिबला मदत मिळू शकली असती. माझ्या मते तो खूप उशीरा गोलंदाजी करायला आला.”

दरम्यान शाकिब अल हसनने चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त 8 षटके टाकली आणि यादरम्यान त्याने 50 धावा दिल्या. बांगलादेशच्या सर्व गोलंदाजांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट सर्वात वाईट होता. कदाचित याच कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने त्याला जास्त गोलंदाजी करायला लावली नाही. शाकिबविरुद्ध अश्विन आणि जडेजाने खूप धावा केल्या.

हेही वाचा – 

IND vs BAN: शतकवीर अश्विनने गायले जडेजाचे गुणगान; म्हणाला, “जेव्हा मी थकलो होतो तेव्हा…”

बीसीसीआय उपाध्यक्षांना मातृशोक, राजीव शुक्ला यांच्या आईचे 97व्या वर्षी निधन
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---