खेळाचा आणि आतंकवादाचा तसा फारसा काही संबंध जरी नसला तरी या गोष्टी कधी एकमेकांसमोर येतील सांगता येत नाही. पाकिस्तान मधील लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या जवळ श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेला आतंकवादी हल्ला खेळाचा आणि आतंकवादाचा संबंध येऊ शकतो हे दाखवून देतो. या झालेल्या हल्ल्यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने तसेच यष्टीरक्षक कुमार संगकारा समवेत सहा खेळाडू जखमी झाले होते.
त्याचप्रमाणे २०१९ साली सुद्धा बांग्लादेश संघ अशाच एका दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावला होता. न्यूझीलंड दौर्यावर गेलेल्या बांग्लादेश संघासोबत आजच्या दिवशी १५ मार्च रोजी ही घटना घडली होती. बांग्लादेश संघ २०१९ साली न्यूझीलंड दौर्यावर गेला असताना तिथे ते क्राइस्टचर्चमध्ये थांबला होते. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांना कसोटी सामना खेळायचा होता. तत्पूर्वी बांगलादेशी खेळाडूंनी जवळ असणाऱ्या मस्जिद मध्ये नमाजासाठी जाण्याचे ठरवले होते.
खेळाडू मस्जिद मध्ये प्रवेश करणार तेवढ्यात एका महिलेने मस्जिदमध्ये गोळीबार चालू असल्याची सूचना दिली. हे ऐकताच खेळाडू पुन्हा बसमध्ये जाऊन बसले. पुढे जवळ जवळ दहा मिनिटे हा गोळीबार चालू होता.
विराट कोहलीसह क्रिकेटप्रेमींना केले सांत्वन
बांगलादेश टीमचे संचालक खलिद मसूद यांनी सांगितले होते की, “आम्ही नशिबवान आहोत की आम्ही आतमध्ये गेलो नाही. बाहेरचे दृष्य हे एखाद्या व्हिडिओ गेम सारखे दिसत होते. खूप लोकांना आम्ही मस्जिद मधून रक्ताने माखलेल बाहेर येताना पाहिले.” पुन्हा कधी असा प्रसंग पहावयास मिळू नये असे कर्णधार मुशफिकुर रहीमने म्हटले होते.
त्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहली तसेच असंख्य क्रिकेट प्रेमींनी त्यांचे सांत्वन केले. तसेच सुरक्षित राहण्यास सांगितले. या झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये एकूण ५१ लोक मृत्यूमुखी पडले होते. न्यूझीलंडच्या इतिहासातला हा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला होता.
महत्वाच्या बातम्या:
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई
हीच ती वेळ, हाच तो क्षण..! कोट्यवधी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पाहा तो सुंदर व्हिडिओ
केरला ब्लास्टर्सला फायनल प्रवेशाची संधी; जमशेदपूरची प्रतिष्ठा पणाला