Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

BANvIND: पंत-अय्यरच्या भन्नाट खेळीने दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव तीनशेच्या पार

BANvIND: पंत-अय्यरच्या भन्नाट खेळीने दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव तीनशेच्या पार

December 23, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


भारताचा युवा विकेटकीपर रिषभ पंत याने ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपासून कसोटीतील प्रभावशाली कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या एका पाठोपाठ विकेट्स पडत असताना महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला, मात्र कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक करण्यापासून थोडक्यात मुकला. बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळला जात आहे.

या सामन्यात भारताचा पहिला डाव 314 धावसंख्येवर संपुष्टात आला आणि भारताने 87 धावांची आघाडी घेतली. रिषभ पंत (Rishabh Pant) या सामन्यात 105 चेंडूत 93 धावांवर बाद झाला. त्याची ही खेळी भारताच्या पहिल्या डावातील विशेष खेळी ठरली आहे. तो त्याच्या कसोटी कारकिर्दीत सहा वेळा 90-99 धावांच्या दरम्यान बाद झाला. त्याला मेहेदी हसन मिराज याने विकेटकीपर नुरूल हसनकरवी झेलबाद केले. या उत्तम खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले.

भारताकडून कसोटीमध्ये नर्व्हस 90चा शिकार सर्वाधिक असे 10 वेळा सचिन तेंडुलकर ठरला आहे. त्यानंतर राहुल द्रविडचा क्रमांक लागतो.

पंतने बाद होण्याआधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 182 चेंडूत 159 धावांची भागीदारी केली. अय्यरही 105 चेंडूत 87 धावा करत बाद झाला. त्याला शाकिबने पायचीत केले. त्यानंतर भारताच्या विकेट्स पडतच राहिल्या. उमेश यादवने 13 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या.

या डावात बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. शाकिबने अय्यर, अश्विन, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना बाद केले. तर तैजुलने भारताच्या पहिल्या तीन (राहुल, गिल, पुजारा) आणि उमेश यांच्या विकेट्स घेतल्या.

Innings Break!#TeamIndia all out for 314 runs, lead by 87 runs.

KS Bharat to keep wickets as Rishabh Pant is experiencing cramps.

Scorecard – https://t.co/XZOGpedIqj #BANvIND pic.twitter.com/De3ViAmc51

— BCCI (@BCCI) December 23, 2022

तत्पूर्वी, या सामन्यात शाकिबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला भारताच्या अश्विन-उमेश जोडीने चुकीचे ठरवले. या दोघांनीही 4-4 विकेट्स घेतल्याने यजमानांचा पहिला डाव 227 धावसंख्येवर संपुष्टात आला.

या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप पूरनची वाढली किंमत! तब्बल 16 कोटींसह ‘या’ संघासाठी उतरणार मैदानात
मूर्ती लहान कीर्ती महान! सॅम करन बनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पहिल्या पाचात एकच भारतीय


Next Post
cameron green

इशानचा विक्रम मोडत कॅमरुन ग्रीन मुंबईच्या ताफ्यात, फ्रँचायझीने मोजली 'इतकी' किंमत

Sam-Curran

मूर्ती लहान कीर्ती महान! सॅम करन बनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पहिल्या पाचात एकच भारतीय

Photo Courtesy: Twitter/@nicholas_47

फ्लॉप पूरनची वाढली किंमत! तब्बल 16 कोटींसह 'या' संघासाठी उतरणार मैदानात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143