---Advertisement---

राजस्थान फ्रँचायझीला मोठा फटका, स्पर्धेपूर्वीच दिग्गज खेळाडू बाहेर

On: बुधवार, ऑगस्ट 28, 2024 2:08 PM
RR
---Advertisement---

कॅरेबियन प्रीमियर लीगला (Caribbean Premier League 2024) गुरुवार (29 ऑगस्ट) रोजी शुभारंभ होणार आहे. सीपीएलमधील पहिला सामना एँटीग्वा बारबुडा फाल्कन्स आणि सेंट किट्स एँड नेविस पॅट्रियोट्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी बार्बाडोस राॅयल्स संघ सीपीएल स्पर्धेचा पहिला सामना (1 सप्टेंबर) रोजी खेळणार आहे. पण त्यांना मोठ फटका बसला आहे. कारण त्यांनी दिग्गज डेव्हिड मिलरच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2024) मध्ये बार्बाडोस रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. मात्र, राष्ट्रीय वचनबद्धतेमुळे तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. या कारणास्तव, बार्बाडोसने पहिल्या दोन सामन्यांसाठी मिलरच्या जागी शमर ब्रूक्सला आपल्या संघात स्थान दिलं आहे. फ्रँचायझीनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन ही माहिती दिली.

बार्बाडोस राॅयल्सनं पोस्ट शेअर करत लिहिलं की, “शमर ब्रूक्स मायदेशी परतला आहे आणि स्टार खेळाडू डेव्हिड मिलरची (David Miller) तात्पुरती जागा घेणार आहे, जो क्रिकेट दक्षिण आफ्रिकेसोबतच्या त्याच्या वचनबद्धतेमुळे केवळ पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकेल.”

35 वर्षीय ब्रूक्स हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. त्याला जगातील वेगवेगळ्या टी20 लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यानं आपल्या टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 67 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 22.79च्या सरासरीनं 1,231 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 1 शतक आणि 3अर्धशतकं झळकावली.

महत्त्वाच्या बातम्या-

झहीर खान लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील होणार? मोठी अपडेट समोर
WTC फायनलचं ठिकाण बदलेल? जय शाह घेऊ शकतात मोठा निर्णय! जुनं वक्तव्य व्हायरल
आयपीएलच्या नियमांवर भडकला ‘हा’ भारतीय खेळाडू! म्हणाला, “त्यांचा अधिकार…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---