गुरुवारी (दि. 08 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावत 469 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगलाच संघर्ष केला. यावेळी भारताची सुरुवात खूपच खराब राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडी 30 धावांच्या आत तंबूत परतली. यानंतर शानदार फॉर्ममध्ये असलेला चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्याकडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या, पण त्यांनी अपेक्षाभंग केला. पुजारा आणि कोहली प्रत्येकी 14 धावा करून बाद झाले.
चेतेश्वर पुजारा 14व्या षटकात कॅमरून ग्रीन याच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर विराट कोहली याला मिचेल स्टार्क याने 19व्या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. भारताचे अव्वल 4 फलंदाज 71 धावांच्या आत तंबूत परतले होते. त्यानंतर सर्व जबाबदारी 18 महिन्यांच्या दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या खांद्यावर होते.
रहाणे यादरम्यान चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळत होता, पण 22व्या षटकात पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या एका चेंडूने भारताला मोठा धक्का दिला. मात्र, नंतर असे काही झाले, ज्याने रहाणेला मोठे जीवनदान मिळाले.
खरं तर, षटकातील अखेरचा चेंडू पॅट कमिन्स याने स्टंप्सच्या लाईनमध्ये गुड लेंथ टाकला, जो हलकासा बाहेर निघाला. या चेंडूवर रहाणे बचाव करण्यासाठी गेला, पण चेंडू ऑफ स्टंपसमोर थेट पॅडवर जाऊन लागला आणि पंचांनी अपील ऐकताच रहाणेला बाद घोषित केले. यानंतर चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला.
https://www.instagram.com/reel/CtPCYd5uvXT/?utm_source=ig_embed&ig_rid=79762d01-cacd-4e4e-a4c5-e34a33b16ab2
पंचांनी बाद दिल्यानंतर लगेच रहाणेने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये पाहिले की, गोलंदाजाचा पाय रेषेच्या थोडा पुढे होता. हा चेंडू नो-बॉल (No Ball) देण्यात आला आणि अशाप्रकारे रहाणे थोडक्यात वाचला आणि त्याने पचांचा सुरुवातीचा निर्णय चुकीचा ठरवला. चेंडू नो-बॉल नसता, तर रहाणेला तंबूचा रस्ता पकडावा लागला असता.
रहाणेला जीवनदार मिळाल्यानंतर त्याने जडेजासोबत 100 चेंडूत 71 धावांची भागीदारी रचली. तसेच, भारताची धावसंख्या 140च्या पुढे नेली. जडेजा 51 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. जडेजानंतर खेळपट्टीवर रहाणेची साथ देण्यासाठी केएस भरत उतरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 5 विकेट्स गमावत 151 धावा केल्या आहेत. रहाणे 29 धावांवर, तर भरत 5 धावांवर नाबाद आहेत. (batsman ajinkya rahane was given out by the umpires but it was a no ball from pat cummins)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका कॅप्टनने काढला दुसऱ्या कॅप्टनचा काटा, रोहितने स्वत:पेक्षा जास्त पंचांवर दाखवला विश्वास, पाहा Video
अर्रर्र! गिल भाऊंचा अंदाज चुकला अन् बोलँडच्या भेदक चेंडूने केल्या दांड्या गुल, व्हिडिओ पाहाच