क्रिकेटमध्ये शतकाला एक वेगळेच महत्त्व असते. शतक हा जरी केवळ एक नंबर किंवा आकडा असला तरी त्याचे पहिल्यापासून खेळाडू व क्रिकेटप्रेमींना कायमच कुतुहल राहिले आहे.
सचिनच्या आंतरराष्ट्रीय १०० शतकांची वाट क्रिकेटप्रेमी व स्वत: सचिन कित्येक महिने पाहत होता. परंतु काही असेही क्रिकेटपटू आहे ज्यांनी उच्च दर्जाचे क्रिकेट खेळूनही त्यांना वनडेत किंवा कसोटीत शतक करता आले नाही. Top 3 batsmen with most ODI runs without a century.
यातील सर्वात दुर्दैवी क्रिकेटपटू ठरला तो पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हक. तब्बल ४२ अर्धशतकं केलेल्या या खेळाडूला कधीही एकही शतक करता आले नाही. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या तीनही क्रमांकावर पाकिस्तानचे खेळाडू आहेत.
३. मोईन खान (Moin Khan)
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राहिलेल्या मोईन अलीने २१९ सामन्यात २३च्या सरासरीने ३२६६ धावा केल्या. यात त्याने १२ अर्धशतके केली. परंतु त्याला कधीही ७२ धावांच्या वर वनडेत मजल मारता आली नाही. नाबाद ७२ ही त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या राहिली.
२. वसिम अक्रम (Wasim Akram)
पाकिस्तानचा माजी कर्णधार राहिलेला वसिम अक्रम हा एक महान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने कसोटीत नाबाद २५७ धावांची खेळीही केली आहे. जी सचिन किंवा रिकी पाॅटींगच्या कसोटीतील खेळीपेक्षाही मोठी आहे परंतु त्यालाही वनडेत शतक करता आले नाही. ३५६ वनडे सामन्यात त्याने १६.५२च्या सरासरीने ३७१७ धावा केल्या. याला त्याच्या फलंदाजीचा क्रमही तेवढाच कारणीभूत होता. त्याने वनडेत ६ अर्धशतके केली असून ८६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली.
१. मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq)
पाकिस्तानचा यशस्वी कर्णधार राहिलेल्या मिसबाह उल हकवरही वनडेतील शतक कायमच रुसले. अगदी ९६ धावांवर मिसबाह नाबादही राहिला आहे. कसोटीत मात्र त्याने १० शतके केली आहेत. मिसबाहने वनडेत १६२ सामन्यात ४३.४०च्या सरासरीने ५१२२ धावा केल्या. या १६२ सामन्यातील १४९ डावात फलंदाजी करताना त्याने तब्बल ४२ अर्धशतके केली. यातील १७वेळा त्याने ७०पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. परंतु तो जादुई आकडा मात्र पार करण्यात मिसबाहला कायमच कठीण गेले.
ट्रेंडिंग घडामोडी-
–शतक कायमचे रुसलेले पण वनडेत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-५ भारतीय क्रिकेटपटूंची अतिशय वादग्रस्त वक्तव्य, ज्यामुळे देशात झाला होता राडा
-किंग कोहलीला आवडतो हा फक्त हा काॅमेंटेटर
-आयसीसी वर्ल्ड ११कडून खेळणारे ३ भारतीय महान क्रिकेटपटू