विवाद हा आधुनिक खेळांचा जिवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तसेच ‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखले जाणारे क्रिकेटही याला अपवाद नाही. असे बर्याच वेळा घडले आहे, जेव्हा क्रिकेटपटू त्यांच्या विवादात्मक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत.
अशाच प्रकारे काही खेळाडूंनी न सांगण्याच्या गोष्टीही जाहीरपणे सांगितल्या आहेत. या गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
१. विरेंद्र सेहवाग- “एकट्या धोनीच्या नेतृत्वाने भारताला विश्वचषक जिंकून दिला नाही”
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) कारकीर्दीच्या शेवटी एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्याच्यातील तणाव अगदी सामान्य होते. त्याने भारतीय कर्णधार म्हणून धोनीच्या यशावर बऱ्यावेळा शंका घेतल्या. परंतु त्याने जेव्हा धोनीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
“मला माहिती नाही की इतरांना काय वाटते. परंतु जेव्हापर्यंत धोनीने भारताचे नेतृत्व केले, तेव्हा आमच्याकडे पूर्वीपासूनच मजबूत संघ होता. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वाने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला नाही. आमच्याकडे चांगला संघ असल्यामुळे आम्ही टी२० विश्वचषक आणि वनडे विश्वचषक जिंकलो. जर तुमच्याकडे चांगला संघ आहे तर तुम्ही विजय मिळवता. हे सोपे आहे,” असे एका मुलाखतीत बोलताना सेहवाग म्हणाला.
२. हार्दिक पंड्या- “सेक्सिस्ट कमेंट”
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखला जातो. परंतु एका टी.व्ही. शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
करण जोहरच्या कॉफी विथ करण या टी.व्ही. शोदरम्यान पंड्या म्हणाला होता की, “जेव्हा मी पहिल्यांदा समभोग केला होता तेव्हा मी घरी येऊन सांगितले की, मी समभोग करुन आलो आहे. एका पार्टीमध्ये माझे आई-वडीलांनी मला विचारले की, तुला आवडणारी महिला कोण आहे? तेव्हा मी म्हणालो की या- या महिला आहेत (महिलांकडे इशारा करत). याबद्दल त्याला अभिमान वाटत होता.”
पंड्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर या घटनेनंतर बीसीसीआयने त्याच्यावर काही काळासाठी बंदी घातली होती. हा कार्यक्रम तात्काळ त्या खाजगी वाहिनीने सगळीकडून हटवला होता.
३. विराट कोहली- “भारत सोडा”
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) त्याच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला होता.
विराटने २०१८मध्ये एक ट्वीट केले होते की, “जो भारतीय राष्ट्रीय संघाचे समर्थन करत नाही, त्याने भारतात राहिले नाही पाहिजे.” या विवादात्मक ट्वीटमुळे संपूर्ण भारतातून राग व्यक्त करण्यात आला होता. अनेक विचारवंतांनी त्याच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. ज्यावेळी सोशल मीडियावर विराटला अधिक प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. तेव्हा त्याला आपली चूक समजली आणि त्याने ट्वीट करून आपल्या चूकीसाठी चाहत्यांची माफीही मागितली.
४. विनोद कांबळी- “सचिन मला विसरला”
हॅरिस शिल्ड स्पर्धेने भारतीय संघाला दोन क्रिकेट रत्ने (खेळाडू) प्रदान केली. यामधील एक रत्न म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि दुसरे रत्न म्हणजेच डावखूरा फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) आहे.
एका टी.व्ही. शोमध्ये कांबळीने मान्य केले की, सचिनने जेव्हा निवृत्ती घेतली होती, तेव्हा त्याने कांबळीच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच सचिनने आपल्याला पडत्या काळात मदत केली नसल्याचेही कांबळी बोलला होता. काही आठवड्यांसाठी सचिन आणि कांबळी यांच्या मैत्रीत दुरावा आला होता. त्यामुळे हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. परंतु चांगली गोष्ट म्हणजे, सचिन आणि कांबळी पुन्हा चांगले मित्र बनले आहेत.
क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात कांबळीने सचिनला मागे टाकले होते. परंतु शिस्तीच्या काही कारणांमुळे तो अधिक काळ भारतीय संघात टिकू शकला नाही. पुढील काही वर्षात त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
५. आशिष नेहरा- “धोनीला शिवी दिली”
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराही अशाच एका विवादात्मक वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
पाकिस्तानचा संघ २००५मध्ये ६ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यावेळी मालिकेतील अहमदाबाद येथे झालेल्या ४थ्या सामन्यात धोनी आणि द्रविड (Rahul Dravid) यांच्या पहिल्या स्लिपमधून शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) झेल सुटला होता. त्यामुळे नेहराने धोनीसाठी अपशब्द वापरला होता. त्यानंतर नेहराने आपली चूक कबूलही केली होती.
यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आशिया ११कडून खेळलेले ५ महान भारतीय क्रिकेटर्स
-या ३वेळी कॅप्टन कूल धोनीला आला होता जबरदस्त राग
-आणि क्रिकेटपासून भटकलेल्या श्रेयस अय्यरला नेले मानसोपचार तज्ञाकडे