मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता स्त्री आणि पुरुष दोघांसाठी ‘फलंदाज’ ऐवजी लिंग तटस्थ शब्द ‘बॅटर’ वापरला जाईल. या नियमांमधील सुधारणा एमसीसी समितीने मंजूर केली आहे. एमसीसीचा हा बदल तात्काळ प्रभावाने अमलात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियमन करणाऱ्या एमसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की,
‘एमसीसीचा असा विश्वास आहे की बॅटर्स या ‘लिंग-तटस्थ’ शब्दाचा वापर (स्त्री किंवा पुरुष दोघांचाही विचार न करता) सर्वांसाठी क्रिकेटचा दर्जा समान करण्यासाठी केला पाहिजे. या सुधारणा या क्षेत्रात यापूर्वीच झालेल्या कामाचा नैसर्गिक विकास आहे आणि एमसीसीचा खेळाप्रती जागतिक जबाबदारीचा एक आवश्यक भाग आहे.’ महिला आणि मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘लिंग तटस्थ’ शब्द स्वीकारण्याची चर्चा केली गेली होती.
अनेक प्रशासकीय संस्था आणि माध्यम संस्था आधीच ‘बॅटर’ हा शब्द वापरत आहेत. एमसीसीने म्हटले,
‘आयसीसी आणि महिला क्रिकेटच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर २०१७ मध्ये याबाबत चर्चा केली गेली होती शेवटच्या ‘रेड ड्राफ्ट’ मध्ये सहमती झाली की ‘फलंदाज’ हा शब्द कायद्याच्या नियमांप्रमाणेच राहील. बॅटर या शब्दाचा वापर नैसर्गिक समानतेसाठी आहे. जो नियमांमधील ‘बॉलर’ आणि ‘फिल्डर’ या संज्ञांशी सुसंगत आहे.’
सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये बॅटर्स हा शब्द वापरण्यात येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मँचेस्टर कसोटीप्रमाणे आयपीएलही रद्द होते का ते पाहू’, मायकेल वॉनची कोपरखळी
Video: अन् चालू सामन्यात अचानक मैदानात उतरले हेलिकॉप्टर, काही क्षणांसाठी खेळही थांबला
कार्तिक त्यागीच्या ‘ऐतिहासिक’ षटकामागील ‘ऑस्ट्रेलियन कनेक्शन’