भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय युवा खेळाडूंचा दबदबा दिसून आला होता. पहिला सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता. तर दुसऱ्या सामन्यात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भागीदारीने भारतीय संघाला पराभवाच्या तोंडातून बाहेर काढत ३ गडी राखून विजय मिळवून दिला होता. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडे श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याची संधी होती. परंतु श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाला चोख प्रत्युत्तर दिले होते. हा सामना श्रीलंका संघाने ३ गडी राखून जिंकला.
या मालिकेत अनेक असे युवा खेळाडू होते, ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चला तर पाहूया कुठल्या गोलंदाजाने जास्त विकेट्स घेतल्या आणि कुठल्या फलंदाजाने जास्त धावा कुटल्या?.(Batting and bowling performance in India vs srilanka odi series)
वनडे मालिकेत फलंदाजांची कामगिरी
फलंदाजांबद्दल बोलायचं श्रीलंका संघाचा सलामीवीर फलंदाज अविष्का फर्नांडोने याने आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात ३३ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ५० आणि तिसऱ्या तिसऱ्या सामन्यात ७६ धावांची खेळी केली. त्याने या मालिकेतील ३ सामन्यात ५३ च्या सरासरीने १५९ धावा केल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन आहे.
शिखरने ३ सामन्यात ६४ च्या सरासरीने १२८ धावा केल्या आहेत. यानंतर श्रीलंका संघाचा चरिथ असलंका आहे. त्याने १२७ धावा तर भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने १२४ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने या मालिकेत १ अर्धशतक झळकावले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘मालिकावीर’ पुरस्कार देण्यात आला.
अशी राहिली गोलंदाजांची कामगिरी
या मालिकेत गोलंदाजांनीही लक्षवेधी कामगिरी केली आहे. मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा मान पटकावला तो युजवेंद्र चहलने. परंतु त्याला तिसऱ्या वनडे सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याने या मालिकेतील २ वनडे सामन्यात २०.४० च्या सरासरीने ५ गडी बाद केले. तसेच सर्वाधिक गडी बाद करण्याचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर दीपक चाहर आहे. त्याने २ वनडे सामन्यात ४ गडी बाद केले.
ही मालिका दीपक चाहरसाठी आठवणीतील मालिका ठरली आहे. त्याने गोलंदाजीने धमख दाखवलाच परंतु फलंदाजी करताना देखील अप्रतिम खेळी केली. त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात ६९ धावा केल्या होत्या. वनडे मालिकेनंतर आता येत्या २५ जुलैपासून टी -२० मालिकेला प्रारंभ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या मुर्खांना काही माहीत नसतं’; श्रीलंकेच्या प्रशिक्षकांचे वादग्रस्त विधान
वारं की अजून काही! फलंदाजाने शॉट मारण्यापुर्वीच स्टंप्सवरील बेल्स पडल्या खाली, पंचही थक्क
‘होय, तो शो टॉपर आहे’; पाहा स्वत: विस्फोटक फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारने कोणाचं केलंय इतकं कौतुक?