---Advertisement---

विक्रम राठोड पुन्हा टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यास उत्सुक; म्हणाले, ‘अजून खूप काम बाकी’

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 2:58 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रदर्शन जास्त विशेष राहिलेले नाही. विशेषतः फलंदाजीत भारतीय संघाची हाराकीरी राहिली आहे. यातच भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान फलंदाजी प्रशिक्षक राठोड यांनी मंगळवारी (२ नोव्हेंबर) या पदासाठी पुन्हा अर्ज केल्याची पुष्टी केली आहे. राठोड यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यामागील आपला हेतू काय आहे? हेही स्पष्ट केले आहे.

फलंदाजीबाबत संघात अजून बरेच काम करायचे आहे, असे फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले. भारतीय संघाच्या विद्यमान सहाय्यक कर्मचाऱ्यांपैकी राठोड हे एकमेव आहेत, ज्यांना पुन्हा आपले पद स्वीकारायचे आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी पुन्हा अर्ज केलेला नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी राठोड म्हणाले, ‘मी फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. मला पुन्हा संधी दिली तर भारतीय संघावर अजून खूप काम करायचे आहे.’ २०१९ मध्ये संजय बांगर यांच्या जागी ते फलंदाजी प्रशिक्षक बनले होते. त्यांचा कार्यकाळ २०२१ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. तर इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते.

विक्रम राठोड यांनी भारतासाठी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे १३१ आणि १९३ धावा केल्या आहेत. त्यांनी १४६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११४७३ धावा केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘विराट कोहली आणि संघासोबत काम करण्याचा अनुभव चांगला राहिला आहे. मला वाटले की ही पत्रकार परिषद विश्वचषकासाठी आहे, पण मी या प्रश्नाचे उत्तर देईन. भारतीय संघासोबत माझा चांगला अनुभव राहिला आहे. अशा प्रतिभावान खेळाडूंसोबत काम करताना आनंद झाला.’

सन २०१९ मध्ये संजय बांगर यांच्या जागी विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक झाले होते. त्यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकापर्यंत होता. मात्र, विश्वचषकात भारतीय फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १५१ धावा केल्या होत्या. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्ध संघाला केवळ ११० धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडचे ‘मिशन सेमीफायनल’! स्कॉटलंडविरूद्ध ‘या’ रणनितीने उतरणार मैदानावर

अफगाणिस्तानला पछाडण्यासाठी ‘थिंक टॅंक’ने कसली कंबर; सराव सत्रात आखली रणनिती

वातावरण तापलं! डी कॉकचे सलग २ चौकार अन् बांगलादेशी गोलंदाजांचा चढला पारा, केली शिवीगाळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---