गुरूवार दि.14 जूनपासून रशियामध्ये 21 व्या फिफा विश्वचषकाला सुरवात झाली आहे. आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीचे तीन सामने होणार आहेत.
त्यामधिल इजिप्त विरूद्ध ऊराग्वे या सामन्यात लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सालाह विश्वचषकात पदार्पण करणार आहे.
याच मोहम्मद सालाहच्या जोरावर इजिप्त 1990 नंतर विश्वचषकासाठी पहिल्यांदा पात्र झाला आहे. 2018 फिफा विशवचषकासाठी झालेल्या पात्रता स्पर्धेत इजिप्तसाठी सर्वाधिक 5 गोल केले होते.
2018 च्या इंग्लिश प्रीमियर लिग स्पर्धेत मोहम्मद सालाहने जबरदस्त कामगिरी करत 36 सामन्यात 32 गोले केले आहेत.
28 वर्षानंतर फिफा विश्वचषकासाठी पात्र झालेल्या इजिप्तची मदार पूर्णपने सालाहवर असेल.
यूएफा चॅम्पियंन्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सालाहच्या आजच्या सामन्यात खेळन्याबाबत शंका होती. पण काल इजिप्तच्या संघ व्यवस्थापनाने तो शुक्रवारच्या सामन्यात खेळणार असल्याचे जाहिर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: