लखनऊच्या अडचणीत वाढ, मार्क वुडच्या रिप्लेसमेंटला बोर्डाने नाकारली आयपीएल खेळण्याची परवानगी

लखनऊच्या अडचणीत वाढ, मार्क वुडच्या रिप्लेसमेंटला बोर्डाने नाकारली आयपीएल खेळण्याची परवानगी

आयपीएल २०२२ हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण लखनऊ सुपर जायंट्सच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आयपीएल २०२२ मध्ये उपस्थित राहणार नसल्यामुळे फ्रेंचायझीला त्याच्या पर्यायी वेगवान गोलंदाजीची आवश्यकता आहे. बांगालदेशचा तस्कीन अहमद एक चांगला पर्यायी खेळाडू बनू शकत होता, पण त्यासाठी आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अर्थात बीसीबीने आडकाठी घातली आहे.

मार्क वुड (Mark Wood) त्याच्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात खेळू शकणार नाही. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला मेगा लिलावात ७.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, पण तो आता खेळू शकणार नाही. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याला लखनऊ फ्रेंचायझीने मार्क वुडच्या पर्याची खेळाडूच्या रूपात खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु बांगालादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तस्कीनला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) दिलेले नाही.

बांगलादेश संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्यांना तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आयपीएल २०२२ दरम्यान, बांगलादेश संघाचे वेळापत्रक व्यस्त असेल आणि याच कारणास्तव बीसीबीने तस्कीनला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली नाही.

हेही वाचा- IPL | बांग्लादेशाच्या ‘या’ खेळाडूसाठी गंभीर बनलाय अधिक ‘गंभीर’, थेट राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाला लावला फोन

बीसीबीचे अध्यक्ष जलाल यूनुसने सोमवारी क्रिकेबजला याविषयी  माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्हाला दक्षिण अफ्रिका दौरा आणि भारताविरुद्ध मायदेशीतल मालिकेसारख्या महत्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे आम्हाला वाटते की, आयपीएलमध्ये सहभाग घेणे त्याच्यासाठी योग्य नसेल. आम्ही तस्कीनसोबत चर्चा केली आहे आणि त्याला परिस्थिती समजली आहे. त्याने फ्रेंचायझीला संगितले आहे की, तो आयपीएल खेळू शकणार नाहीय. तो दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि नंतर मायदेशात परतेल.”

दरम्यान, तस्कीन अहमदच्या मुद्द्यावरून लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीरने बीसीबीसोबत फोनवरून चर्चा केल्याचीही माहिती आहे, पण या चर्चेचा कसलाही फायदा झाल्याचे दिसत नाही. बांगालदेशी माध्यामांतील वृत्तानुसार गंभीर आणि तस्कीन यांची रविवारी (२० मार्च) ढाकामध्ये भेट देखील झाली होती. गंभीरने वेगवान गोलंदाजाला अट घातली होती, की आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघ्यार घ्यावी लागेल, जी ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. आता लखनऊला मार्क वुडची जागा घेण्यासाठी लवकरात लवकर दुसरा पर्यायी गोलंदाज शोधावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यसभेसाठी अर्ज भरताच हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ऑलिम्पिमध्ये एक-दोन नाही, ‘एवढी’ पदके पाहिजेत

आयपीएलच्या १५व्या हंगामात ‘या’ अँकर्स वेधणार साऱ्यांचे लक्ष, यादीत बुमराहची पत्नीही सामील

फाफ डू प्लेसिस सर्वात ‘स्वस्त’, तर ‘हा’ खेळाडू बनला आयपीएल १५मधील सर्वात महागडा कर्णधार, घ्या जाणून

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.