बांगलादेश विरूद्ध वेस्ट इंडिज (Bangladesh vs West Indies) संघात आगामी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) (8 डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत नियमित कर्णधार नझमुल हुसैन शांतोच्या (Najmul Hossain Shanto) अनुपस्थितीत अष्टपैलू मेहदी हसन मिराझची (Mehidy Hasan Miraz) संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
नझमुल हुसैन शांतो आणि मुशफिकर रहीम दुखापतीतून सावरू शकले नाहीत, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नाहीत. युवा प्रतिभावान फलंदाज तौहीद हृदयही (Towhid Hridoy) संघाचा भाग नसेल, कारण फुटबॉल खेळताना त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे.
यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास, परवेझ हुसैन इमॉन, अफिफ हुसैन ध्रुबो, हसन महमूद आणि तंजीम हसन साकिब यांचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. परवेझ हुसेनची याआधी 2021 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध निवड झाली होती, मात्र या मालिकेदरम्यान त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराझ आता प्रथमच नझमुल हुसेन शांतोच्या अनुपस्थितीत बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एका निवेदनात म्हटले आहे. तौहीद हृदोयने उजव्या मांडीवर दुखत असल्याची तक्रार केली, त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो खेळण्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याची पुन्हा तपासणी करू. असे बीसीबीचे क्रीडा चिकित्सक मंजूर हुसैन चौधरी म्हणाले आहेत.
वेस्ट इंडिजविरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघ- मेहदी हसन मिराज (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), तनजीद हसन तमीम, सौम्या सरकार, परवेझ हुसेन इमॉन, मोहम्मद महमुदुल्ला, झाकेर अली अनिक, अफिफ हुसैन ध्रुबो, रिशाद हुसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, शुक्ल मोहम्मद. तंजीम हसन साकिब, नाहिद राणा
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहितनंतर जसप्रीत बुमराह…” स्टार खेळाडूचे बुमराबद्दल मोठे वक्तव्य!
जसप्रीत बुमराह, माॅर्ने माॅर्केलमुळे सिराज बनला हीरो? म्हणाला, “मी जस्सी भाईशी…”
IPL 2025; लिलावात अनसोल्ड ठरलेल्या 3 स्टार खेळाडूंना मिळू शकते संधी! कसं ते जाणून घ्या