---Advertisement---

भारतासोबत खेळून मालमाल होणार श्रीलंका क्रिकेट, ६ सामन्यांचे मिळणार चक्क ‘इतके’ कोटी

On: गुरूवार, जुलै 8, 2021 3:58 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये येत्या काही दिवसांत मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतून श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला बक्कळ पैसा मिळणार आहे. याबाबतची माहिती श्रीलंकन क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षांनी दिली आहे.

जेव्हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, तेव्हा फक्त ३ सामने खेळवले जाणार होते. परंतु श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसमोर ६ सामने खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव बीसीसीआयने मान्य देखील केला होता. (Bcci agree to play 6 matches instead of 3 raise overall US 12million in revenue says SLC president)

श्रीलंकन क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी म्हटले की, “बीसीसीआयमुळे आम्हाला अतिरिक्त ६ मिलियन डॉलर्स कमावण्यात यश आले. आम्ही बीसीसीआयकडे सामन्यांची संख्या वाढवण्यासाठी मागणी केली होती. त्यांनी ही मागणी स्वीकार केली होती. आम्हाला यातून आता १२ मिलियन डॉलर्सची (८९.७२ कोटी) कमाई होणार आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला या मालिकेतून चांगलीच कमाई होणार आहे, ज्याचा उपयोग क्रीडा मंत्री उमल राजपक्षे हे खेळांशी निगडित असलेल्या योजनांमध्ये गुंतवू शकतात.”

तसेच ते पुढे म्हणाले, “कोरोना व्हायरसमुळे जास्त मालिका खेकवता आल्या नाही. तरीदेखील आम्ही आमच्या क्रिकेटपटूंच्या वेतनात कुठलीही कपात केली नाही. त्यांना प्रत्येक सुविधा दिली जात आहे.”

असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी-२०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटचा दादा…

क्रिकेटची खेळपट्टी ते भलीमोठी जिम; ‘कोलकाताच्या प्रिंस’चा ४८ खोल्यांचा ६५ वर्षे जुना राजमहाल पाहिलाय का?

‘धवन’ची आर्मी लंकादहन करण्यासाठी होतेय सज्ज, इंट्रास्क्वॉड सामन्यात दाखवला दम; बघा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---