भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी आणि वनडे मालिका खेळल्यानंतर भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बुधवारी (5 जुलै) संघाची घोषणा केली गेली. हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना विश्रांती दिली गेली आहे. मात्र, एकूण संघ निवड पाहता बीसीसीआय व निवड समितीने आता टी20 क्रिकेटमध्ये भविष्याच्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडलेल्या या संघात वरिष्ठ खेळाडू दिसून येत नाहीत. नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना या संघात स्थान मिळालेले नाही. त्यांना विश्रांती दिली गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मागील चार टी20 मालिकांमध्ये ही जोडी खेळली नव्हती. आता सलामीवीर म्हणून शुबमन गिल, ईशान किशन व यशस्वी जयस्वाल हे या दौऱ्यावर दिसणार आहेत. तर मधल्या फळीत तिलक वर्मा प्रथमच भारतीय संघात खेळताना दिसेल. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व संजू सॅमसन हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाजीचा भार अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान व मुकेश कुमार यांच्या खांद्यावर असला तरी, त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे मात्र पुनरागमन होईल.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले होते की, टी20 संघाबाबतचा अंतिम निर्णय वनडे विश्वचषकापर्यंतच घेतला जाईल. टी20 संघासाठी रवींद्र जडेजा, विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार व रविचंद्रन अश्विन यांचा विचार केला जाणार नाही. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाच यापुढे टी20 संघासाठी विचार केला जाईल. आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघ हार्दिक पंड्याच्याच नेतृत्वात खेळेल.
(BCCI And Selection Committee Start Thinking About India T20 Team Resting Virat Rohit Ashwin)
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI । जयस्वालपासून ते बिश्नोईपर्यंत; रोहितच्या अनुपस्थितीत ‘यांना’ संधी, प्रमुख दावेदार मात्र बाहेरच
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद