येत्या ४ मार्च पासून आयसीसी महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तसेच सर्व संघांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंची घोषणा करायला सुरुवात केली आहे. दरम्यान बीसीसीआयने देखील आयसीसी विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौरसारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामीची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असू शकते. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत दोन हात करणार आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२२ पासून न्यूझीलंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे.
दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या या संघात जेमिमा रोड्रिग्ज, शिखा पांडे आणि राधा यादव यांसारख्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही.
असा आहे विश्वचषक स्पर्धेसाठी आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया. (याष्टिरक्षक ), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
राखीव खेळाडू: एस मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर.
असे आहे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे वेळापत्रक
६ मार्च – भारत विरुद्ध पाकिस्तान, तौरंगा
१० मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन
१२ मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन
१६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड , तौरंगा
१९ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलँड
२२ मार्च – भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन
२७ मार्च – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ख्राईस्टचर्च
???? NEWS ????: India Women’s squad for ICC Women’s World Cup 2022 and New Zealand series announced. #TeamIndia #CWC22 #NZvIND
More Details ????https://t.co/qdI6A8NBSH pic.twitter.com/rOZ8X7yRbV
— BCCI Women (@BCCIWomen) January 6, 2022
तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या एकमात्र टी२० सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड , पूनम यादव, एकता बिष्ट
महत्वाच्या बातम्या:
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
हे नक्की पाहा :





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा